महाराष्ट्र

‘हे अलीबाबा आणि ४० चोरांचं सरकार, चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल

 

खासदार संजय राऊत आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात काही दिवसांपासून चांगलीच शाब्दिक चकमक सुरु झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर केलेल्या वक्तव्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत ‘सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून चोराच्या मनात चांदणं दिसतंय’, असं म्हणत महाविकास आघाडीला आयकर विभाग आणि ई़डीची एवढी भीती का वाटतेय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा वाद पेटल्याचं दिसून येतंय.

‘हे अलीबाबा आणि ४० चोरांचं सरकार, चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल’, असा घणाघाती हल्ला चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर चढवला आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांच्या महाराष्ट्रात होणाऱ्या कारवाई व धाडसत्रावरून राजकारण चांगलंच पेटलं असल्याचं पाहायला मिळत आहे.

Back to top button