बीड

शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या बीड जिल्हाप्रमुख पदी रवी मुडेगावकर यांची नियुक्ती

शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या बीड जिल्हाप्रमुख पदी रवी मुडेगावकर यांची नियुक्ती

बीड(प्रतिनिधी):- शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा.श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना सचिव संजय मोरे साहेब यांच्या सूचनेवरून बांधकाम कामगार सेनेचे प्रमुख प्रीतम शेठ धारिया यांच्या संमतीने मराठवाडा प्रमुख विनोद नेमाडे यांनी शिवसेना संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे व जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या शिफारशीवरून शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या परळी व केज/ अंबाजोगाई विधानसभा क्षेत्राच्या जिल्हाप्रमुखपदी  रवी मुडेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आली.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करुन शिवसेनेला बळ देण्याचे काम सुरु आहे. शिवसेनेमध्ये युवकांना पद देऊन मानाचे स्थान देण्यात येत आहे. बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी रवी मुडेगावकर यांची निवड करण्यात आली. परळी व केज/ अंबाजोगाई विधानसभा क्षेत्राची जबाबदारी मुडेगावकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याबद्दल शिवेसना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी मुडेगावकर यांचे स्वागत केले आहे.

Back to top button