बीड

शालेय पावसाळी क्रिडा स्पर्धेत खेमानंद इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश……..

शालेय पावसाळी क्रिडा स्पर्धेत खेमानंद इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश……..

जामखेड प्रतिनिधी – शनिवार दि.२१ सप्टेंबर २०२५ रोजी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल. ना. होशिंग विदयालय जामखेड येथे पार पडलेल्या १४ वर्षे वयोगट मूलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत खेमानंद इंग्लिश स्कूलच्या विदयार्थिनींनी प्रथम कमांक मिळविला व त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच १४ वर्षे वयोगट मूले यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. खर्डा येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत कू.शिवम घोडके या विदयार्थ्याने १४ वर्ष वयोगटात लांब उडी व उंच उडी या क्रिडा प्रकारात प्रथम कमांक मिळविला व त्याचीही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तसेच सार्थक वाघमोडे या विदयार्थ्याने १७ वर्ष वयोगटात तिहेरी उडी या क्रिडा प्रकारात प्रथम कमांक मिळविला तसेच कू.हेमंत वर्मा याने १४ वर्ष वयोगटात गोळाफेक या क्रिडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला.
या विदयार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. त्यांना सुभाष फूलमाळी सरांचे मार्गदर्शन लाभले.
या विदयार्थ्यांचे प्राचार्य एस.एम.वेल व शिक्षकांतर्फे अभिनंदन करण्यात आले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिवराव लोखंडे, उपाध्यक्ष विजय पवार व संस्थेचे सचिव सतिष शिंदे यांनीही विदयार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबाबत त्यांचे हार्दिक अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Back to top button