बीड
आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इको-फ्रेंडली आकाश कंदील स्पर्धा, बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेला मिळाली उत्तम संधी

—
विविध महाविद्यालयांतील ८१ ग्रुप्सचा उत्स्फूर्त सहभाग; सी.ए. कल्याणी सारडा यांच्या हस्ते झाले उद्घाटन
—-
प्रतिनिधी | बीड
शहरातील नामांकित आदित्य शिक्षण संस्थेच्या आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सोमवार २ नोव्हेंबर रोजी आकर्षक ‘इको-फ्रेंडली आकाश कंदील स्पर्धा’ मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांमधून आलेल्या तब्बल ८१ ग्रुप्सचा उत्साहात सहभाग नोंदवत आपल्यातील नावीन्यपूर्ण कौशल्यांचे सुंदर दर्शन घडवले. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करत विद्यार्थ्यांनी साकारलेले आकाश कंदील उपस्थितांचे विशेष आकर्षण केंद्रबिंदू ठरले.
ही कार्यशाळा आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सी.ए. कल्याणी सारडा, डॉ. राहुल खडके, डॉ. कुमार सुरवसे, डॉ. अकबर सिद्दीकी, बावणे मॅडम, वाघ सर आणि डॉ. कृष्णा पंत उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सी.ए. कल्याणी सारडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि कंदील प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली.
स्पर्धेच्या यशस्वी मूल्यांकनासाठी अमित प्रतापराव गाढे, अक्षरा ईश्वर गिरे आणि हरिष अशोक शेरेकर या तज्ज्ञ व्यक्तींनी परीक्षण केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दर्शन इंगोले आणि नितीन धायगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा पवार व इंदिरा महाजन या होतकरू विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
परीक्षक अमित गाडे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले. ते म्हणाले, सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकतेने आणि सुंदर पद्धतीने इको-फ्रेंडली आकाश कंदील तयार केले आहेत. अशा प्रकारच्या स्पर्धा चॅट जीपीटी किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून सहज माहिती शोधण्यापेक्षा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यांच्यातील उपजत क्रिएटिव्हिटीला योग्य चालना देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांच्या हस्तकलेला व कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी आकर्षक पारितोषिक देण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक : समीक्षा सिरसाट ५,००० चे ॲमेझॉन व्हाऊचर, द्वितीय सारिका सुनील बनसोडे ३,००० चे ॲमेझॉन व्हाऊचर, तृतीय (संयुक्त) : मोमीन जाहिद
समर्थ सरवदे, रेहान तांबोळी, शेख झिदाने प्रत्येकी २,००० चे ॲमेझॉन व्हाऊचर, उत्तेजनार्थ पारितोषिक : हर्षदा बोबडे व मयुरी बोबडे यांना देण्यात आले. स्पर्धेतील सर्व विजेते आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुका करण्यात आले.
—–
छोट्या-छोट्या दुकानदारांकडून खरेदी करून त्यांच्या आनंदात सहभागी व्हा- सी.ए. कल्याणी सारडा
उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना सी.ए. कल्याणी सारडा यांनी उपस्थितांना मोलाचा संदेश दिला. त्या म्हणाल्या, आकाश कंदील खरेदी करण्यासाठी बाजारात भरमसाठ पैसे खर्च करण्याची कोणतीही गरज नाही. विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी नेहमी इको-फ्रेंडली आकाश कंदील तयार करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच, मोठ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर करण्याऐवजी आपल्या परिसरातील छोट्या-छोट्या स्थानिक दुकानदारांकडून व व्यावसायिकांकडून आकाश कंदील खरेदी करावेत, जेणेकरून त्यांच्याही सणासुदीच्या दिवसांत आनंदात भर पडेल. असे आवाहन कल्याणी सारडा यांनी केले.