📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सौ. के.एस.के. महाविद्यालयात यशस्वी कॅम्पस मुलाखती संपन्न

सौ. के.एस.के. महाविद्यालयात यशस्वी कॅम्पस मुलाखती संपन्न
बीड (प्रतिनिधी)ः येथील सौ. के.एस.के. महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल च्या वतीने दि. 02 फेब्रुवारी 2026 रोजी पदवी व पदव्युत्तर वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षण पुर्ण होताच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात आला. या कॅम्पस मुलाखतीसाठी टॅलेंट फॉर सोल्युशन प्रा. लि. तळेगाव येथील नामांकीचे फील्ड ऑफीसर श्री शिवाजी पाटील व टीएसपीएल कंपनीचे एचआर श्री परीक्षीत खिल्लारे हे उपस्थित होते. या कॅम्पस मुलाखतीसाठी महाविद्यालयातील अंतीम वर्षातील 115 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. मुलाखतीच्या विविध पातळीमधून विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान, संवाद कौशल्य व कार्यक्षमता यांची तपासणी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगीतले. उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळानकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नुसून कौशल्य, संवाद क्षमता व आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा आहे. या मुलाखती नंतर बागलाने समर्थ, दराडे शुभम, दिवटे प्रज्ञा, शिंदे दत्ता, सानप श्रेयश, हाडुळे ॠषी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. योगेश क्षीरसागर, प्रशाकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे, डॉ. विश्वंभर देशमाने, प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळानकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. खान ए. एस. व सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर कॅम्पस मुलाखतीचे समन्वयक डॉ. लक्ष्मण गाडेकर यांच्यासह डॉ. एस.एस. जाधव, प्रा.दिपक पवार, प्रा. किर्ती पांडुळे, प्रा. विकास पवार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. लक्ष्मण गाडेकर यांनी केले तर प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. अशोक डोंगरे यांनी मानले.
Back to top button