बीड
मुख्याध्यापक शेरखान सर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मिल्लिया शाळेत वृक्षारोपण

मुख्याध्यापक शेरखान सर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मिल्लिया शाळेत वृक्षारोपण
बीड (प्रतिनिधी) – शहरातील सुप्रसिद्ध मिल्लिया प्राथमिक (मुलांची) शाळेचे मुख्याध्यापक शेरखान सर यांचा वाढदिवस शाळेत वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
शेरखान सर हे पेशाने जरी मुख्याध्यापक असले तरी त्यांचा सामाजिक कार्यात नेहमी हिरीरीने सहभाग असतो. समाजात वावरताना आपल्याकडून समाजातील दीनदलित, गोरगरीब, गरजू लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी शक्य होईल ते कार्य करण्यास ते नेहमी पुढाकार घेतात. नुकताच त्यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने त्यांचे सहशिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी झाडांची रोपे आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या. त्यांनी सहकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या झाडांची रोपे ही शाळेच्या आवारातच रोपित केली. यावेळी पठाण अमजद, शेख वसीम, वरिष्ठ लिपिक इम्रान सर, मोमीन अज़हरोद्दीन सर, इक्बाल सर, मिल्लिया शाळेचे शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



