संपादकीय

मुश्रीफसाहेब ! माझ्या अंत्यसंस्कारालाही तुम्ही यायचच………..

 

बिद्री ता. कागल येथील जेष्ठ नागरिक श्री. पांडुरंग कोंडीबा पाटील, वय -७५ यांचे गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी भेटून कुटुंबियांचे सांत्वन केले.

पाटील आणि नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे ऋणानुबंधही तितकेच घट्ट. गोरगरिबांचा नेता म्हणून मुश्रीफसाहेबांवर त्यांची अपार श्रद्धा, माया होती. साहेबांचाही त्यांच्यावर तितकाच जीव. ते ज्या- ज्या वेळी मुश्रीफसाहेबांना भेटायचे, त्या -त्या वेळी कोणतेही काम असो, प्रश्न असो. अगदी थोरल्या भावाच्या, वडीलकीच्या नात्याने हक्काने सांगत असत.

निधन झाल्याच्या आदल्या दिवशी सकाळी आठ वाजता कागलला येऊन ते नामदार मुश्रीफसाहेबाना भेटून गेले होते. भेटून परत जाता-जाता ते असेही म्हणाले होते की, “गेली तीस-पस्तीस वर्षे तुम्ही माझा सांभाळ केलाय. माझ्या अंत्यसंस्कारालाही तुम्ही यायचं.” खरंतर मरणच त्याना दिसलं होतं की काय? अशी भावना मंत्री मुश्रीफसाहेब यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच त्यांचे निधन झाले, त्यावेळी विमानाने मुंबईला गेल्यामुळे अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहू शकलो नाही, याबद्दल खंतही व्यक्त केली.

Back to top button