📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बावी जिल्हा परिषद शाळेत सामूहिक योगाभ्यासाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

बावी जिल्हा परिषद शाळेत सामूहिक योगाभ्यासाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

कांस्यपदक विजेत्या सीमाताईंकडून विद्यार्थ्यांना योगाचे धडे

जामखेड प्रतिनिधी : जामखेड तालुक्यातील बावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे केरळ तिरुअनंतपुरम येथे झालेल्या नॅशनल योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या, तसेच पुणे जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेल्या गावातीलच योगपटू सौ. सीमा सुधीर पवार यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांना योगाचे धडे दिले.

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. आनंद पवार, श्री. हनुमंत निकम महाराज, श्री. सुधीर लालासाहेब पवार तसेच अनेक पालक उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर हनुमंत निकम महाराज यांच्या हस्ते सौ. सीमा सुधीर पवार यांचा सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तसेच शाळेतील मुलांना योगाचे प्रशिक्षण दिल्याबद्दल शाल, फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

Back to top button