संपादकीय

आता पुण्यात रिक्षादरवाढीनंतर आता CNG दरात सुद्धा वाढ

पुणे | कोरोना संसर्गाने जगभरात हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनानं डोकं वर काढलं असून या महामारीत सगळीकडे मृत्यूचा तांडव पहायला मिळाला. या महामारीत अनेकांना बऱ्याच संकटाना तोडं द्यावं लागलं.त्यातच म्हणजे आता पुण्यात रिक्षा दरवाढीनंतर आता CNG मध्ये वाढ झालेली पाहायला मिळते

इंधन दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पहायला मिळाले. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला असातना रिक्षाचे दरही महागले असल्याचं समोर आलं आहे. रिक्षाची दरवाढ होताच आता पुणेकरांनी आणखी एक फटका बसला आहे. रिक्षा दरवाढीनंतर आता सीएनजीमध्येही दरवाढ झाली असल्याचं समोर आलं आहे. इंधन दरवाढीमुळे आता सीएनजीही महागला आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात किलोमागे 1 रुपया 80 पैसे इतकी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ झाल्यानं पुण्यात सीएनजीचा दर हा 63 रुपये 90 पैसे झाला आहे. देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे प्रवाशांचेही हाल होत आहेत. नागरिकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Back to top button