राजकीय

बंगालमध्ये पार पडलेल्या पोटनिवडणुकीत तृणमूलच्या सर्व उमेवारांचा विजयी

 

पश्चिम बंगाल | पश्चिम बंगाल मध्ये पार पडलेल्या पोटनिवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जादू पुन्हा चालली आहे. दिनहाटा, गोसाबा, खर्डा आणि शांतीपूर विधानसभा जागांसाठी ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. आता हाती आलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर टीएमसीच्या उमेदवारांनी सर्व जागा जिंकल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत टीएमसीने भाजपचा दारूण पराभव केला होता. भवानीपूरसह तीन विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत विजयाचा धडाका कायम राहिला आणि आता पुन्हा सर्व टीएमसीचे उमेदवार चार विधानसभा जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.या विजयासह विधानसभेत टीएमसीच्या आमदारांची संख्या २१७ झाली आहे.

चार विधानसभेच्या जागांपैकी निसिथ प्रामाणिक आणि जगन्नाथ सरकार हे अनुक्रमे दिनहाटा आणि शांतीपूर या दोन जागांवर विजयी झाले, पण भाजपला त्या जागाही वाचवता आल्या नाहीत. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर टीएमसीने पुन्हा विजयाचा धडाका कायम ठेवला आहे.

Back to top button