टंचाई आराखड्या नुसार लवकरात लवकर विंधन विहीरी घेवुन महिला व नागरीकांचे पाणयासाठी होणारे हाल थांबवावेत – संजय होळकर

टंचाई आराखड्या नुसार लवकरात लवकर विंधन विहीरी घेवुन महिला व नागरीकांचे
पाणयासाठी होणारे हाल थांबवावेत – संजय होळकर
बीड (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यातील प्रत्यक तालुक्यामध्ये पाणी टंचाई असलेल्या गावांचा टंचाई आराखड्यामध्ये समावेश करावा या करिता जननगरसेवक संजयभैय्या बाबुराव होळकर हे गेल्या अनेक वर्षा पासून प्रयत्न करत आहेत. त्यानुसार 2021-22 मध्ये अनेक टंचाईग्रस्त गाव, वाडी, वस्तीवर संबाधित अधिकारी यांना घेवून जाऊन संजय भैय्या बाबुराव होळकर यांनी पाणी टंचाईची तिव्रता प्रशासनाच्या निदर्शनास अनुन देवून प्रशासकीय वेगवेगळ्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन पाठपुरावा करून अनेक ठिकाणी विंधन विहीरी मंजूर करून घेवून त्या ठिकाणी बोअर / विंधनविहीर घेवून बीड़ जिल्ह्यातील त्या अनेक ठिकाणचा पाणी प्रश्न सोडवला होता. त्यानंतर देखील प्रत्यक वर्षी उन्हाळ्यामध्ये जननगरसेवक संजय भैय्या बाबुराव होळकर हे बीड जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील पाणी टंचाई असूलेल्या गाव, वाडी, वस्तीचे टंचाई अराखड्यात नाव घेण्यासाठी प्रयत्न करून विंधनाविहीर मंजूरी साठी स्वतः धावपळ करून प्रत्यक संबंधीत ऑफिसमध्ये अधिकार्यांच्या भेटी घेवून पाठपुरावा करून विंधन विहीरी मंजूर करून घेण्याचे काम संजय भैय्या बाबुराव होळकर हे करतात. परंतू गेल्या चार-पाच वर्षापासून टंचाई आराखडा व विंधन विहीरी मोठी धावपळ करून मंजूर करून घेतलेल्या असतांना सुध्दा प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे बोअर, विंधन विहीरी घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पाण्याची तिव्रता असलेल्या ठिकाणच्या नागरीकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. त्यामुळे यावर्षी प्रशासकीय स्तरावर संजय भैय्या बाबुराव होळकर यांनी प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समिती मध्ये बीड जिल्हा परिषद ग्रामिण पाणी पुरवठा विभागामध्ये, जिल्हा परिषद मध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये, भुजल सर्वेक्षण विभागामध्ये पाठपुरावा करून व धावपळ करून टंचाई आराखडा मंजूर करून घेण्यासाठी मोठे परिश्रम घेतले असून या पुढी प्रशासकीय स्तरावरील प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून विंधन विहीरी, बोअर घ्यावेत व मागील काही वर्षा प्रमाणे दफ्तर दिरांगईमुळे मंजूर असलेल्या विंधन विहीरी घेतल्या गेल्या नाहीत. तसे पुन्हा यावेळेसही होऊ नये व ग्रामीण भागातील महिला नागरीकांचे, जनावरांचे पाण्यासाठी होणारे हाल थांबवावेत अशी जननगरसेवक संजय भैय्या बाबुराव होळकर यांनी मागणी केली आहे.



