मुंबई

मुंबईतील सर्वात उंच इमारतीला लागली आग, महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थानी हजर

 

मुंबई | मुंबईतील लालबाग परिसरात इमारतीला भीषण आग लागली असून करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आगीची घटना घडली आहे. सध्या अग्निशामक दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

लोअर परिसरातील अविघ्न पार्क या इमारतीला ही आग लागली आहे. या घटनेत काही नागरिक जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. मात्र आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेलं नाही.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमी व्यक्तीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. सध्या आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली आहे हे अद्याप समोर आलेले नाहीये.

Back to top button