संपादकीय

 नवाब मालिकांची पाठराखण करत शरद पवारांनी लगावला भाजपाला जोरदार टोला

 

 

मुंबई | भाजपच्या आरोपांना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिल आले आहे. भाजपच्या महाविकासआघाडी विरोधातल्या ठरावावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस टीका केली आहे. भाजपचा राज्य कार्यकारिणीतला कालचा ठराव हा हास्यास्पद आहे, असे पवार म्हणाले. अधिकारांचा गैरवापर जिथे होतं आहे, त्याला एक्सपोज करण्याचे काम नवाब मलिक करत आहेत, ही त्यांची जबाबदारी आहे. जो अधिकाराचा गैरवापर होतोय त्याबाबत नवाब मलिक बोलत आहेत, वानखेडे प्रकरणी केंद्राने लक्ष दिलं पाहिजेत, असे पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे कामही चांगले आहे, असे ते म्हणाले.

 

शरद पवार म्हणाले, सीमित कार्य काळाकरता ज्यांना सत्ता मिळाली त्यांनी या सत्तेचा गैरवापर कसा केला हे सगळ्या जनतेने पाहिला आहे. सत्ता मिळत नसल्याने नैराश्यातून अशा पद्धतीचे आरोप करत आहेत त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. भाजपचा राज्य कार्यकारिणीतला कालचा ठरावाबाबत सकाळी वर्तमानपत्रात या बद्दल वाचलं तेव्हा एक जोक ऐकल्याचा आनंद झाल्याचा खोचक टोला पवार यांनी लगावला.

 

ते पुढे म्हणाले की, ज्यांनी यापूर्वी भाजपासोबत काम केलं त्यांनी त्यांची कंपनी सोडली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काहीही बोललं जाते. पार्टटाइम मुख्यमंत्री या  वक्तव्यात दम नाही, मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात. त्यांना जबाबदारी दिली आहे, जनतेने स्वागत केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ऑपरेशनचे संकट आले होते, पण तरीही ते काम सुरू करत आहे, असे सांगत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.

 

 

 

Back to top button