इस्रो सहल जिल्हास्तर परीक्षेत बसरवाडी शाळेची मोठी कामगिरी

इस्रो सहल जिल्हास्तर परीक्षेत बसरवाडी शाळेची मोठी कामगिरी
सुरज सुळसकर व मनिषा मुटके यांचा सत्कार
जामखेड प्रतिनिधी – जि.प. प्राथमिक शाळा बसरवाडी येथे शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत इस्रो सहल जिल्हास्तर परीक्षेसाठी जामखेड तालुक्यातून पहिल्या पाचमध्ये बसरवाडी शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल कार्यक्रम घेण्यात आला. ही शाळेसाठी व गावासाठी अभिमानाची बाब आहे. बसरवाडी शाळेचे एकूण तेरा विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. त्यामध्ये सुरज राजेंद सुळसकर -178, मनिषा श्रीराम मुटके -174, सोहम भाऊसाहेब निकम -168, मोनाली संपत सुर्वे -148, अनन्या भास्कर तनपुरे -146, अन्वी श्रीकांत काळे -132, रुद्र भरत कडू -128, कल्याणी मारूती निकम -126, स्वराज गहिनीनाथ काळे -126, साक्षी बिभीषण फाळके -124, श्रावणी अमोल वाघ -112, वेदिका दादा निकम -112, ज्ञानेश्वरी काका बागल -110 अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. जिल्हास्तर निवड झालेले विद्यार्थी सुरज राजेंद्र सुळसकर, मनिषा श्रीराम मुटके व वर्गशिक्षक तात्यासाहेब घुमरे सर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती निकम, मा. ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब पिंपरे, मा. ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र निकम, पालक राजेंद्र सुळसकर, राहीबाई सुळसकर, श्रीराम मुटके, गहिनीनाथ मुटके, नवनाथ मुटके, बिभीषण फाळके, अशोक सुळसकर, विनोद पाचबैल, माऊली फाळके, शांतीनाथ निकम, विष्णु मुटके, बलभीम फाळके, बाबासाहेब मुटके, रामनाथ कडू, कुंडलिक मुटके, भाऊ बापू फाळके, बाजीराव सुर्वे, बाबु सुर्वे, दादा सुळसकर तसेच मुख्याध्यापक एकनाथ (दादा) चव्हाण व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



