बीड

श्री क्षेत्र दत्त संस्थान येथे गुरुपौर्णिमा उत्सव व श्रीमद गुरूचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन

श्री क्षेत्र दत्त संस्थान येथे गुरुपौर्णिमा उत्सव व श्रीमद गुरूचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन

श्रींच्या नुतून रजत मुर्ती चलप्राणप्रतिष्ठा निमित्ताने २ दिवसीय दत्तयागाचे आयोजन; दत्तउपासक गुरूवर्य धर्माचार्य श्रीहरी महाराज पवार यांच्या अधिपत्याखाली भव्यदिव्य सोहळा
बीड (प्रतिनिधी):-प्रति गाणगापूर अशी ओळख असलेले श्री क्षेत्र दत्त संस्थान,कोल्हारवाडी फाटा,बीड येथे गुरुपौर्णिमा उत्सवा निमित्ताने श्रीमद् गुरुचरित्र पारायण व गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा आयोजित केला आहे.तब्बल १५ वर्षांची परंपरा जपत श्री अवधुत दत्त देवस्थान च्या वतिने दि.०३ जुलै गुरुवार ते १० जुलै गुरुवार या कालावधीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये श्रीमद् गुरुचरित्र पारायण,श्रींची पुजा व आरती, हरिपाठ,श्री दत्त महामाला मंत्र जप अनुष्ठान,दत्तयाग हवन व अन्नदान असे दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन आहे.
         महाराष्ट्रात नामांकित असलेल्या या सोहळ्यात सकाळी ९ ते १२ श्रीमद् गुरुचरित्र पारायण, दुपारी १२:३० श्रींची पुजा व आरती,संध्या ५ वा.हरिपाठ व श्री दत्त महामाला मंत्र अनुष्ठान व संध्या ७:३० वा श्रींची सांज आरती होईल.
दि.९ जुलै व १० जुलै रोजी श्रींच्या नुतून रजत मुर्ती चलप्राणप्रतिष्ठा निमित्ताने २ दिवसीय दत्तयाग होईल.
दि.१० जुलै गुरुवार गुरूपौर्णिमा या दिवशी दुपारी १२ वा. श्रींची महाआरती होईल व तदनंतर संस्थान तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.तसेच सामुहिक गुरुमंत्र सोहळा दुपारी २ वाजता होऊन सायंकाळी ७ ते १० यावेळेत श्रींचा पालखी सोहळा होईल.तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र दत्त संस्थानचे दत्तउपासक गुरूवर्य धर्माचार्य श्रीहरी महाराज पवार यांनी केले आहे.
Back to top button