बीड
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना बाजार कोतवाली वेस पर्यंत रस्त्याचा काम तात्काळ सुरू करा,

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना बाजार कोतवाली वेस पर्यंत रस्त्याचा काम तात्काळ सुरू करा,
अन्यथा १४ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन – अमरजान पठाण
बीड / प्रतिनिधी :-छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजुरी वेस,कारंजा रोड,बलभीम चौक,जुना बाजार ते कोतवाली वेस पर्यंतच्या रस्त्याचा काम तात्काळ सुरू करण्यात यावा अन्यथा येत्या १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता बीड नगरपरिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अमरजान पठाण यांनी आज दिला.
पठाण यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, बीड शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजुरी वेस, कारंजा रोड, बलभीम चौक, जुना बाजार ते कोतवाली वेस पर्यंतचा हा रस्ता नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून सध्या याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून, पावसामुळे ते जलमय झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा तर निर्माण झालाच आहे, शिवाय कोणताही जीवघेणा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.हा रस्ता शहरातील प्रमुख व्यापारी मार्ग असून, दररोज जिल्हाभरातून व्यापारी व नागरिक या भागात ये – जा करतात. रस्त्याची ही अवस्था नागरिकांच्या संयमाचा अंत पाहणारी ठरत आहे.
मनसेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर तात्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही,तर १४ ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी ११:०० वाजल्या पासून बीड नगर परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असे बीड नगरपरिषद कार्यालय, कार्यकारीअभियंता बीड,व जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.



