बीड
आज शांतीब्रम्ह नवनाथ बाबा यांची बक्करवाडी येथे भव्य मिरोणूक

आज शांतीब्रम्ह नवनाथ बाबा यांची बक्करवाडी येथे भव्य मिरोणूक
दोन धाम पूर्ण; स्वागतास भाविक भक्तांनी उपस्थित रहावे
बीड ( प्रतिनिधी) गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज मठाधिपती महंत श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी यांचे आज दि. 24 फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळी 4:30 वाजता दोन धाम यात्रा पूर्ण करून बक्करवाडी येथे आगमन होणार आहे
गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांनी रामटेक नागपूर, मैहर शरद देवी, प्रयागराज, वाराणशी (काशी) गोरखपुर, पशुपतिनाथ नेपाळ,मनोकामनादेवी नेपाळ, चंद्रगिरी नेपाळ, भोलेश्वार नेपाळ, अयोध्या, चित्रकूट, मंदाकिनी नदी आरती, उज्जैन महाकालेश्वर, काळभैरव, ओंकारेश्वर, मुक्ताई नगर, बीड असा दोनधाम यात्रा प्रवास पूर्ण करून आगमन होणार आहे
गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांचे दोनधाम यात्रा पूर्ण करून बक्करवाडी येथे आगमन होणार आहे म्हणून सर्व भाविक भक्ताच्या वतीने गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांची भव्य मिरोणूक आयोजन भाविक भक्ताच्या वतीने बक्करवाडी फाटा ते बक्करवाडी गाव येथे भव्य मिरोणूक आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी बाबाच्या स्वागत मिरवणुकीस उपस्थित रहावे



