बीड

खर्डा; जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शुक्रवार पेठेत विद्यार्थ्यांचा निरोप व विशेष भेट

खर्डा; जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शुक्रवार पेठेत विद्यार्थ्यांचा निरोप व विशेष भेट

जामखेड प्रतिनिधी (खर्डा) : आज दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शुक्रवार पेठ येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांद्वारे शाळेविषयी प्रेम आणि शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना शाळा सोडताना वाटणाऱ्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेचे माजी विद्यार्थी श्री. योगेश भैसडे यांनी वाढदिवसानिमित्त शाळेसाठी मोठा टेबल भेट दिला. मुख्याध्यापिका श्रीमती कामिनी राजगुरू यांनी आपल्या मनोगतात भैसडे यांच्या शाळेतील संस्कारांचा गौरव करत इतर पालकांनाही शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात जिल्हा शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन श्री. ज्ञानेश्वर थोरात, माजी मुख्याध्यापिका सौ. उषाताई थोरात, ग्रामपंचायत सदस्या सौ. कांचनताई शिंदे,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.कामिनी राजगुरू, सहशिक्षिका सौ.स्वाती गलांडे, ज्योती भैसडे, योगेश भैसडे
तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सांगतेस मिठाईचे वाटप करण्यात आले.

Back to top button