बीड

ल.ना.होशिंग विद्यालय येथे वार्षिक पारितोषिक कार्यक्रम संपन्न

ल.ना.होशिंग विद्यालय येथे वार्षिक पारितोषिक कार्यक्रम संपन्न

प्रत्येक क्षेत्रात मी पहिला असेल,असे उदिष्ट विद्यार्थ्यांनी डोळ्यांसमोर ठेवावे – रविंद्र भापकर

जामखेड प्रतिनिधी;-विद्यार्थ्यांनी यश- अपयश बाजूला ठेवून नियमित नियोजन करून विद्यार्थ्यांना प्रत्येक घटकांवर मार्गदर्शन करावे.स्पर्धेचे युग असून सहजासहजी यश मिळत नाही.विद्यार्थ्यांनी मी प्रत्येक क्षेत्रात पहिला असेल.असे उदिष्ट डोळ्यांसमोर ठेवून भविष्यात शास्त्रज्ञ , वैमानिक क्षेत्रात नाव चमकवावे असे प्रतिपादन रविंद्र भापकर यांनी केले.

जामखेड येथे दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल.ना.होशिंग विद्यालय येथे दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीची प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना एकनाथ चव्हाण म्हणाले की,स्पर्धा ही स्वतः शी असावी , दुसऱ्या शी नसावी.असे मत एकनाथ चव्हाण यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण चिंतामणी होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते रविंद्र भापकर तसेच आदर्श शिक्षक एकनाथ चव्हाण होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे, संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंगवी, सैफुल्ला खान, शरदराव देशमुख,सुमतीलाल कोठारी,संचलिका संगिता देशमुख,नलिनी कुलकर्णी, प्राचार्य बाळासाहेब पारखे, माजी प्राचार्य अनंता खेत्रे, उपप्राचार्य सादिक शेख, उपमुख्याध्यापक प्रविण गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने,कलाशिक्षक मुकुंद राऊत, बबन राठोड, भरत लहाने, किशोर कुलकर्णी , राघवेंद्र धनलगडे सर ,एन सी सी विभाग प्रमुख अनिल देडे, नरेंद्र डहाळे, विशाल पोले, साईराज भोसले, आदित्य देशमुख , हनुमंत निकम, शिवकुमार डोंगरे आदी पालक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

यावेळी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन तसेच २०२४ या वर्षीचा गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार देडे अनिल कुंडलिक यांना संस्थेने दिला असून त्यांना गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी केले तसेच सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे, संगिता दराडे, प्रमिला पोकळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सादिक शेख सर यांनी मानले.

चौकट
या वर्षी दहावी (एसएससी) आणि बारावीच्या ( एचएससी ) बोर्ड परिक्षेत प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने ११,००० रूपये बक्षीस देण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख यांनी माहिती दिली.

Back to top button