बीड
शासनाने शिवराज मोटेगावकरची संपूर्ण संपती जप्त करावी – इंजि. देगलूरकर

शासनाने शिवराज मोटेगावकरची संपूर्ण संपती जप्त करावी – इंजि. देगलूरकर
नांदेड (प्रतिनिधी) : नीट पेपर फूट प्रकरणी सध्या अटक असलेल्या शिवराज मोटेगावकरची संपूर्ण संपती शासनाने जप्त करावी अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य इंजि. चंद्रप्रकाश जी. देगलूरकर यांनी केली आहे.
लाखो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरसीसीच्या शिवराज मोटेगावकर आणि टीमची राज्य व देशात असलेली सर्व संपती शासनाने जप्त करावी, त्यांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर चालवावे, त्यांची सविस्तर चौकशी करुन विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्या व मृत्यूस कारणीभूत धरुन खून तसेच मोक्का व देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केली आहे.
भ्रष्ट आणि चोर नेते विशिष्ट राजकीय पक्षात प्रवेश करुन पवित्र होत असतात तसे मोटेगावकर सारख्यांना अभय न देता फाशीचीच शिक्षा कशी मिळेल याची तजवीज शासनाने केली पाहिजे तसेच त्यांच्या आरसीसीच्या माध्यमातून तयार झालेल्या बोगस डॉक्टरांच्या पदव्या हिसकावून घेतल्या पाहिजेत अशी संतप्त भावना बहुजन समाज पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी व्यक्त केली आहे.
विकाऊ सत्ता व भ्रष्ट संपत्तीच्या जोरावर क्लिनचीट मिळवून मोटेगावकर सारखे महाभाग पुन्हा उजळ माथ्याने वावरु नयेत यासाठी लातूर, नांदेड व पुणे येथील जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलावीत. मोटेगावकरची बँक खात्यासह सर्व चल व अचल मालमत्ता जप्त करावी, आरसीसी इमारतीवर बुलडोझर चालवावे अशीही मागणी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केली आहे.


