📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

ग्रामीण जनतेच्या विश्वासामुळे तलवाडा शाखा अल्पावधीत लोकप्रिय झाली – पृथ्वीराज पंडित

ग्रामीण जनतेच्या विश्वासामुळे तलवाडा शाखा
अल्पावधीत लोकप्रिय झाली – पृथ्वीराज पंडित
तलवाडा शाखेचा १० वा वर्धापन दिन श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर उत्साहात साजरा
गेवराई, दि. ५ (प्रतिनिधी) ग्रामीण जनतेच्या विश्वासामुळे तलवाडा शाखेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली असे प्रतिपादन युवानेते पृथ्वीराज पंडित यांनी केले. ग्रामीण भागातील सभासद, खातेदार, ठेवीदार आणि कर्जदारांचा विश्वास संपादन करत सेवा आणि सहकार्याची दशकभराची यशस्वी वाटचाल करणाऱ्या शिवशारदा मल्टीस्टेटच्या तलवाडा शाखेचा १० वा वर्धापन दिन श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दशकपूर्तीच्या निमित्ताने शाखेच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तलवाडा येथील जयकिसान कृषी सेवा केंद्राचे गजेंद्र थोरात व सौ. सोनाली गजेंद्र थोरात यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. त्यानंतर युवा नेते पृथ्वीराज पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवशारदा मल्टीस्टेटच्या गेल्या दहा वर्षांच्या वाटचालीचे कौतुक करून संस्थेच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना पृथ्वीराज पंडित म्हणाले की, “शिवशारदा मल्टीस्टेटने ग्रामीण भागातील खातेदार आणि ठेवेदारांचा विश्वास संपादन केला आहे. गरजू नागरिकांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम केल्यामुळे तलवाडा शाखेने अल्पावधीतच जनमानसात लोकप्रियता मिळवली आहे. यापुढील काळातही ग्रामीण भागातील जनतेच्या गरजा लक्षात घेऊन मल्टीस्टेटच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतील.माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांच्या विचारांचा वारसा घेऊन माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार विजयसिंह पंडित आणि शिवशारदा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित हे काम करत आहेत. त्यामुळे शिवशारदा मल्टीस्टेटविषयी जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे, असेही पृथ्वीराज पंडित म्हणाले.
शिवशारदा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग पंडित यांच्या मार्गदर्शनातून सुरू झालेल्या या संस्थेने अवघ्या दशकभरात ग्रामीण भागातील जनतेच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन विविध सेवा आणि कर्ज योजनांच्या माध्यमातून आपली विश्वासार्हता निर्माण केली आहे. सभासद, खातेदार आणि कर्जदारांचे प्रेम, विश्वास व सहकार्य हीच संस्थेची खरी ताकद असून, भविष्यातही अधिक सक्षमपणे आणि प्रभावीपणे सेवा देण्याचा संस्थेचा मानस आहे, असे यावेळी सांगण्यात आले. उपस्थितांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.
या कार्यक्रमास डॉ. आसाराम मराठे, सुभाष मस्के, गणपत नाटकर, नजीर कुरेशी, बापू गाडेकर, दिनकर पघळ, अमोल मडके, संतोष काळे, दादा रोकडे, प्रकाश परहाड, प्रल्हाद लाड, बंडू धापसे, नंदकुमार पवार, बद्रीनारायण नाटकर, अज्जू सौदागर, बाप्पासाहेब पंडित, चंदुकाका पंडित, किरण वावरे, हरिभाऊ फलके, भास्कर गवते, उद्धव फलके, अजय पंडित तसेच माध्यमिक विद्यालय, तलवाडा येथील शिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गेवराई शाखेचे व्यवस्थापक गणेश रुकर, तलवाडा शाखेचे व्यवस्थापक यशवंत पंडित, कर्मचारी आदिनाथ जाधव, सिद्धेश्वर इंगळे, अशोक माने यांच्यासह शिवशारदा मल्टीस्टेटचे कर्मचारी, सभासद, कर्जदार व खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button