बीड
दुष्काळात पीक करपून गेली मग पिककर्ज भरायचं कस?:- राजेंद्र आमटे

दुष्काळात पीक करपून गेली मग पिककर्ज भरायचं कस?:- राजेंद्र आमटे
नियमित कर्जदारांच्या कर्जमाफीसाठी नागपूर येथे शासन निर्णयाची होळी केली
बीड (प्रतिनिधी) शासनाने नियमित कर्जदारांना कर्जमाफी दोन वगळले आहे नियमित कर्जदाराने ज्या पिकासाठी पीक कर्ज काढले ते पीक कापूस सोयाबीन ऊस दुष्काळामुळे ही पिके करपून गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये नियमित कर्जदार शेतकऱ्यांनी पीक कर्ज कसे भरायचे असा संतप्त सवाल शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी नागापूर खुर्द येथे कर्जमाफी शासन निर्णयाची होळी करताना केला
सरकारने कर्जमाफी निर्णयामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेतून वंचित ठेवले आहे. नियमित शेतकऱ्यांनी घ्या पिकासाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे ती शेतकऱ्यांच्या शेतातील पीक कापूस सोयाबीन ऊस तुर उडीद ही पीक दुष्काळामुळे करपून गेलेले आहेत शेतकऱ्यांच्या हातात काहीही आलेलं नाही मग ज्या पिकासाठी शेतकऱ्याने कर्ज काढलेले आहे ते शासनाचे कर्ज शेतकऱ्यांनी भरायचे कसे दुष्काळामुळे रेगुलर कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज तात्काळ माफ करण्यात यावे अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी नागापूर खुर्द येथे शासनाच्या कर्जमाफी जीआर चे होळी करताना मागणी केली यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी शासनाच्या कर्जमाफी जीआर ची होळी करत तात्काळ नियमित कर्जदारांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
अनेक बँकांनी शेतकऱ्यांना नवे जुने करून घेतले यामध्ये अडाणी शेतकऱ्यांना फसवून कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी आशा दाखवत शेतकऱ्यांकडून सह्या अंगठी करून घेतल्या यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत या सर्व रेगुलर शेतकऱ्यांनी ज्या पिकासाठी कर्ज घेतला आहे ते पीक दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेलेला आहे म्हणून सरकारने तात्काळ नियमित कर्जदारांचे पीक कर्ज माफ करावे अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाचे शेतकरी नेते राजेंद्र आमटेयांनी केली यावेळी नागपूर खुर्द येथे खाजाभाई पठाण ,राजाभाऊ साळुंखे,प्रभू साळुंके, विष्णू साळुंखे, राजकुमार साळुंके शंकर लव्हाळे, नारायण साळुंके, प्रकाश जोंजळ, गोपीनचंद साळुंके, सुमंत साळुंके,



