📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पहिल्या योजनेला निधी नाही, मग नव्या योजनेची घोषणाबाजी कशासाठी? – गौरव राठोड यांचा संतप्त सवाल

पहिल्या योजनेला निधी नाही, मग नव्या योजनेची घोषणाबाजी कशासाठी? – गौरव राठोड यांचा संतप्त सवाल
​बीड: प्रतिनिधी
पहिल्या योजनेसाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे ती योजना बंद पडत असल्याची माहिती खुद्द संबंधित विभागाकडून मिळत आहे. अशा परिस्थितीत आधी पहिल्या योजनेचा निधी कुठे गेला याचा हिशेब द्या आणि नंतरच नवीन योजना आणा, अशी आक्रमक भूमिका भ्रष्टाचारमुक्त पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गौरव राठोड यांनी घेतली आहे. त्यांनी राज्यमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर थेट सवाल उपस्थित करत नवीन घोषणाबाजीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
​पहिल्या योजनेचा निधी कुठे गेला?: योजना निधीअभावी बंद पडत असेल, तर मंजूर झालेला निधी नेमका कुठे खर्च झाला, याचा जाब राठोड यांनी संबंधित विभाग, मंत्री आणि सचिवांना विचारला आहे.NLM (नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन) योजनेच्या अंमलबजावणीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे सुमारे ५५० शेतकरी कुटुंबे संकटात सापडली असून शासनाने याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा न देता केवळ नवीन योजनांची घोषणा करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करत, जोपर्यंत जुन्या योजनेतील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत नवीन घोषणा करू नका, असा इशारा देण्यात आला आहे.
​राठोड यांचे प्रशासनासमोर थेट प्रश्न:
​पहिल्या योजनेसाठी मंजूर झालेला निधी किती होता?
प्रत्यक्ष किती निधी वितरित व वखर्च झाला?
शिल्लक निधी असल्यास तो सध्या कुठे आहे?
योजना बंद पडत असल्यास त्याला जबाबदार कोण?
शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मंजूर अनुदान मिळाले का?
​”निधी नसताना फक्त घोषणाबाजी करून शेतकऱ्यांना पुन्हा कर्जाच्या खाईत ढकलू नका, आधी पहिली योजना पूर्ण करा आणि रखडलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्या,” अशी ठाम मागणी गौरव राठोड यांनी केली आहे.
Back to top button