संपादकीय

सीडीएस बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर क्रॅश ?

 

लष्करी हेलिकॉप्टर तामिळनाडूत कोसळल्याची माहिती समोर येत असून सदर हेलिकॉप्टरमध्ये सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत देखील असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे.संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतदेखील हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. याबाबत लष्कराकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते. १४ पैकी ४ जण अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. निलगिरी पर्वत रांगामध्ये आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली आहे. दोन मृतदेह आढळून आले आहेत. तर ४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या लष्कराचे जवाण तसेच स्थानी पोलीस याचा तपास करत आहेत.

तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या Mi सीरिज हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून स्थानिकदेखील मदत करत आहेत. मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत आहेत.

Back to top button