महाराष्ट्र

मोठी बातमी | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

 

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्तामुळे पश्चिम महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राजू नानासो जानकर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जानकर यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आटपाडी पोलीस ठाण्यासमोर गाडी अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन सध्या आटपात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि महाविकास आघाडीत संघर्ष सुरु झाला आहे. राष्ट्रवादीच कार्यकर्ते जानकर यांचे मेहुणे शिवसेनेच्या उमेदवारास मदत करीत असल्याच्या रागातून पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांनी मारहाण केल्याचा आरोप राजू जानकर यांनी केला आहे.

याबाबच राजू जानकर यांनी सांगितले की, आमदार पडळकर यांनी दमदाटी केली. तसेच आटपाडी पोलीस ठाण्यासमोर येण्याचं आव्हान दिलं. त्यानंतर आटपाडी पोलीस ठाण्यासमोर आलो असता पडळकर यांनी अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जानकर यांनी केला आहे. राजू जनकर यांच्या तकारीनुसार पोलिसांनी आमदार पडळकर यांच्यासह गणेश भुते या दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आटपाडी पोलीस करीत आहेत.

Back to top button