
आळगीतील महिलांना डॉ. पवळ यांनी दिले स्वयंरोजगाराचे धडे
बीड( प्रतिनिधी ) : सोलापूर जिल्ह्यातील तालुका अक्कलकोट येथील बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आळगी येथे महिला बचत गटातील महिलांसाठी दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व गांडूळ खत निर्मिती या विषयांवर दिनांक 17 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2026 दरम्यान 12 दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात महिलांना स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बीड येथील राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षक डॉ. पवळ लक्ष्मण यांनी महिलांना दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन, गांडूळ खत निर्मिती, व्यवसायाचे नियोजन, उत्पादन प्रक्रिया तसेच त्यातून मिळणारे उत्पन्न याबाबत सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान महिलांना व्यवसायाची माहिती मिळावी, यासाठी सहलीचे देखील आयोजन करण्यात आले होते. संबंधित विषयी स्थळांना भेट देऊन प्रशिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी प्रशिक्षक डॉ. पवळ लक्ष्मण, कोणदे, सीएमआरसी मंगरूळ, पवित्रा कोळी, सीआरपी आळगे तसेच हतुरे अॅग्रो सायन्स एफपीओ, गुड्डेवाडीचे चेअरमन संगप्पा हतुरे उपस्थित होते. डॉ. लक्ष्मण पवळ महाराष्ट्रातील बीड, जालना, पुणे,रत्नागिरी आदी जिल्ह्यात प्रशिक्षण देत आहेत. तसेच राष्ट्रीय पातळीवरचे प्रशिक्षक असल्याकारणाने देशभरातील इतर राज्यात देखील स्वंयरोजगार प्रशिक्षण देण्यासाठी जात आहेत. दि. 28 सप्टेंबर 2026 रविवार रोजी आळगी ता.अक्कलकोट येथे प्रशिक्षण समारोह उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमात उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्याबद्दल एफपीओ चे संचालक संगप्पा हातुरे यांनी राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. लक्ष्मण पवळ यांचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रशिक्षणार्थी महिला संगीता संतोष कोली हिने प्रशिक्षण दरम्यान आलेले अनुभव कानडी भाषेतील कवितेतून व्यक्त केले. कार्यक्रमास आहे की येथील महिला बचत गटातील महिला भोसले उपस्थित होत्या.



