ब्रेकिंग

ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाइंड समीर वानखेडेच, अटक करून चौकशी करा – काँग्रेस

 

मुंबईतील क्रुझ पार्टीच्या वादावरून आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी अमीर वानखेडे यांनाच आरोपी केले आहे. आता त्या पाठोपाठ काँग्रेसने सुद्धा वनडे यांच्यावर आरोप लगावला आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपचा हात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे ते आज नागपूर येथे पत्रकार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हा आरोप केला आहे.

लोंढे म्हणाले की, ड्रग्ज सापडलेली इनोव्हा गाडी एमएच 12- 3000 ही गाडी रवींद्र कदम यांच्या नावावर आढळली. त्यांचा पत्ता कराडचा आहे. याच गाडीत 21 सप्टेंबरला तीन हजार किलोचा ड्रग्ज पकडले गेले. त्यानंतर ते 22 सप्टेंबरला गुजरातमध्ये पोहचतात. ते गुजरातचे मंत्री राणा यांना भेटतात. त्यानंतर दोन ऑक्टोबरला काम हो गया, असा व्हिडिओ व्हायरल होतो. त्यापूर्वीसुद्धा याच गाडीतून ड्रग्ज गेल्याची माहिती आहे.

सुनील पाटील हे समीर वानखेडेशी संबंधित आहेत. या सर्वांचा मास्टरमाइंड समीर वानखेडे आहे. त्यामुळं त्यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली. गाडीमालक रविंद्र कदम यांना अटक केली, तर वास्तव बाहेर येईल. कराड येथील दिलेल्या पत्त्यावर रवींद्र कदम राहत नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
देशात आलेले ड्रग्ज लपवण्यासाठी हिंदू-मुसलमान वादाचा घाट घातला जातोय. गौतम अदानीच्या पोर्टवर ड्रग्जची झालेली कारवाई जगातली सर्वात मोठी कारवाई आहे. पण, यापासून लक्ष भटकावं म्हणून मुंबई ड्रग्ज प्रकरण काढण्यात आल्याचं अतुल लोंढे म्हणाले.

मध्यप्रदेशातील नीरज यादव हा भाजपचा कार्यकर्ता आहे. ड्रग्ज प्रकरणाचा मास्टर माइंड एनसीबीचे समीर वानखेडे आहेत. त्यांना अटक करावी. 50 लाखांची देवाणघेवाण झाल्याची चर्चा आहे. नशेचा विळखा घातला जातोय. याची महाराष्ट्र सरकारनं चौकशी करावी. ही देशाच्या लोकशाहीची बाब आहे. युवकांचे भविष्य बिघडविण्याचे काम भाजप करत आहे. गाडीचा मालक रवींद्र कदम, सुनील पाटील, समीर वानखेडे, किरण गोसावी, भानुशाली हे एकदुसऱ्याची संबधित आहेत.

Back to top button