संपादकीय

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

 

कल्याण | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा शिरकाव तर होणार नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. संबंधित व्यक्तीने कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही, तसेच तो केपटाऊनवरून परतला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आता त्या डोंबिवलीतील व्यक्तीच्या कुटूंबियांची कोरोना चाचणी कऱण्यात आली आहे. त्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल समोर आला आहे. तसेच कोरोना अहवालामध्ये चाचणी करण्यात आलेल्या सहा जणांपैकी पाच जणांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डाॅ. प्रतिभा पानपाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित परदेशातून परतलेल्या कोरोना रुग्णाच्या कुटूंबातील सहा जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी आता ५ जणांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला आणि तो निगेटिव्ह आहे शिवाय आणखी एकाचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. संबंधित रूग्णाच्या शरिरात नवा ओमिक्राॅन व्हेरिएंट आहे की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.

Back to top button