📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

महावीर जयंतीनिमित्त अरिहंत जैन सेवाभावी संस्था, दिगंबर जैन मंदिर व आनंदऋषी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

महावीर जयंतीनिमित्त अरिहंत जैन सेवाभावी संस्था, दिगंबर जैन मंदिर व आनंदऋषी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

परळी वैजनाथ, दि.31 (प्रतिनिधी)ः- महावीर जन्म कल्याणक निमित्त अरिहंत जैन सेवाभावी संस्था, दिगंबर जैन मंदिर व आनंदऋषी नेत्रालय अहिल्यनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. मोफत नेत्र तपासणी शिबिरात 220 रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.
परळीतील गणेशपार भागातील जैन मंदिर सभागृहात सोमवार दि.30 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रतिष्ठीत व्यापारी शांतीलालजी जैन, विजयजी वाकेकर, धरमचंदजी बडेरा, ओमप्रकाशजी मुळुजकर, प्रकाशचंद कांकरिया, सौ.लता तातेड, सौ. मधुबाला कांकरिया आदींची प्रमुख उपस्थिती लाभली. या शिबिरात नेत्रतज्ञ गणेश तवळे यांनी रूग्णांची तपासणी केली. त्यांना कुंदन शिंदे, अरूण वाघमारे, गणेश घोलप आदींनी सहकार्य केले. शिबिराचे वैशिष्टये म्हणजे 6 महिन्याच्या बाळाची देखील नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराला सकल जैन समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी अरिहंत जैन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रितम बोरा, सचिव धिरज बडेरा यांच्याह त्यांचे सर्व पदाधिकारी तसेच महावीर संघई, महावीर महालिंग, मयूर मुळजकर, नेमिचंद कुरकूट, रमेश संघई, धीरज दुरुगकर, अमोल संघई, वैभव कुरकुट, कुलभूषण कटके आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मयूर मुळजकर यांनी केले. **

Back to top button