दबंग तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी उभा राहून शेतरस्ता केला मोकळा

बीड तालुक्यातील मौजे इट गांगनाथवाडी शिवरातील गेल्या चालीस वर्षांपासून रखडलेला शेतरस्ता तहसलदार चंद्रकांत शेळके साहेब यांनी स्वत: उभा राहून मोकळा करत शेतकऱ्याची अडचणी दूर केली.
बीड : तालुक्यातील मौजे इट येथील चालीस वर्षांपासून रखडलेला शेतरस्ता तहसलदार चंद्रकांत शेळके साहेब यांनी स्वत: उभा राहून मोकळा करत शेतकऱ्याची अडचणी दूर केली.
तहसीलदार शेळके यांनी शेत रस्ता केला मोकळा !
गंगनाथवाडी शिवार येथील गट नं.253 येथील प्रकार
शेतकऱ्याने मानले प्रशासनाचे आभार ; अनेक दिवसांचा त्रास संपला !
तालुक्यातील ईट येथील दत्तात्रय सखाराम नरनाळे, गोरख माणिकराव नरनाळे यांच्या गट नंबर 253 मधील शेतात शेती कामासाठी गाडी रस्ता नसल्याने, त्यांना आपल्या शेतातील मशागतीची कामे, शेतातील माल व साहित्य दूरवरून डोक्यावर घेऊन जावे लागत होते, तसेच शेतील कामे करण्यासही अडचणी येत होत्या. शेतकरी दत्तात्रय सखाराम नरनाळे व गोरख नरनाळे यांनी तहसील कार्यालयात धाव घेत व्यथा मांडली. तहसीलदार श्री. चंद्रकांत शेळके मंडळ अधिकारी सौं. वंदना विघणे यांना यांनी स्वतः पंचनामा करून अर्जदार व गैरअर्जदारांना सुनावणीला बोलवून सर्व शेतकऱ्यांचे नुकसान न होता, सर्वे नंबरप्रमाणे रस्ता मोकळा करून देत, शेतरस्त्याचा प्रश्न निकाली काढला. या कार्यवाहीनंतर शेतकरी दत्तात्रय सखाराम नरनाळे, गोरख माणिक नरनाळे यांनी समाधान आभार व्यक्त केले. यावेळी तहसीलदार शेळके साहेब, मंडळ अधिकारी वंदना विघ्ने, तलाठी काकडे साहेब, पोलीस कर्मचारी व संबंधित दोन्ही बाजूंचे शेतकरी भगवान कदम महादेव लबासे पंच आदी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
मौजे ईट ता.जि. बीड येथीलगंगनाथवाडी शिवार येथील गट नं.253 या गटातील 5 एकर जमीनीसाठी आडवलेला रस्ता मंडळ अधिकारी तथा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मोकळा करून दिला आहे . येथील शेतकरी तथा संपादक दत्तात्रय नरनाळे यांच्या पाच एकर शेतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर संबंधित शेतकऱ्याने अतिक्रमण करत शेतीकडे जाणारा गाडी रस्ता अडवला होता. याप्रकरणी नरनाळे यांनी तहसील बीड यांच्याकडे रस्ता मोकळा करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाचा पंचनामा व तपास मंडळ अधिकारी श्रीमती विग्ने यांनी केला सर्व गोष्टीचा अभ्यास करत रस्ता अडवणाऱ्या शेतकऱ्याला समज देण्यात आली मात्र तरीही रस्ता मोकळा करण्यास विरोध करण्यात येत होता. शेताकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने दत्तात्रय नरनाळे यांचे शेतमालाचे नुकसान व आर्थिक नुकसानाला सामोरे जाण्याची वेळ आली होती. संबंधित प्रकरणाचा संपूर्ण तपास मंडळाधिकारी तथा तहसीलदार यांनी करत पिंपळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या साह्याने हा रस्ता मोकळा करून दिला. मौजे ईट ता.जि.बीड येथीलगंगनाथवाडी शिवार येथील गट नं.253 या गटातील 5 एकर जमीनीसाठी आडवलेला रस्ता खुला करुन देण्यासाठी अर्जदार दत्तात्रय नरनाळे यांनी तहसीलदार बीड यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. मागील काही दिवसात या रस्ता बद्दल अधिक तपास व पंचनामा मंडळ अधिकारी तथा तलाठी यांच्या साह्याने पूर्ण करण्यात आला होता. संबंधित शेतकऱ्याकडे दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने याच रस्त्याचा वापर अधिक सोयीचा होता. परंतु संबंधित शेतकऱ्याने नरनाळे यांच्या शेताकडे जाणारा रस्ता चढवल्याने भविष्यात पीक पाणी व खत तथा इतर शेतीच्या कामासाठी रस्ता नसल्याने नरळे यांना आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ आली होती. या प्रकरणाचा संपूर्ण तपास मंडळ अधिकारी श्रीमती विग्ने यांनी केला शेतकऱ्यांची सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांची ही जबाब नोंदणी घेण्यात आली हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून गाडी रस्ता म्हणून ओळखला जात होता मात्र संबंधित शेतकऱ्याने रस्ता बंद केल्याने नरनाळे यांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. संबंधित प्रकरण बीड तहसीलदार यांच्याकडे दाखल करण्यात आले मंडळ अधिकाऱ्यांना यासंबंधी तपास करण्याचा आदेश तहसीलदार यांनी दिला होता या प्रकरणाचा संपूर्ण तपास व पंचनामा करत परिसरातील शेतकऱ्यांची नोंदी व जवाब नोंदवण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता शेतीसाठी वापर केला जात असतानाही संबंधित शेतकऱ्याने जाणून-बुजून हा रस्ता बंद केल्याचे निष्पन्न होतात रस्ता मोकळा करण्यासंदर्भात तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मंडळ अधिकारी यांना दिनांक 30 ऑगस्ट रोजी संबंधित शेतकऱ्याचा अडवलेला रस्ता मोकळा करून देण्यासंदर्भात आदेश दिले होते. तसेच या प्रकरणात शेतकऱ्याने जर आढळून गेली तर त्यासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्यालाही बंदोबस कामे मदत घेण्याची सूचना मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. हा रस्ता मोकळा करण्यासाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके मंडळ अधिकारी श्रीमती विकणे यांच्यासह पिंपळनेर पोलीस ठाण्यातील कर्मचारी स्पॉटवर हजर होते. जेसीबीच्या साह्याने रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे. गाडी रस्ता मोकळा करून दिल्याबद्दल संबंधित शेतकरी दत्तात्रय नरनाळे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनीही तहसीलदार चंद्रकांत शेळके श्रीमती विग्ने यांच्यासह महसूल कर्मचारी तथा पिंपळनेर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले आहे.



