आळंदीच्या सर्वांगीण विकासाचा बिगुल — प्रकाश कुराडे यांचा जाहीरनामा जाहीर

आळंदीच्या सर्वांगीण विकासाचा बिगुल — प्रकाश कुराडे यांचा जाहीरनामा जाहीर
“एकदा संधी द्या, आळंदी बदलून टाकू” — घड्याळ चिन्हावर जोरदार उमेदवारी
आळंदी : प्रतिनिधी-आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रकाश कुराडे यांनी भव्य जाहीरनामा प्रसिद्ध करत आळंदीकरांना विकासाची ठोस हमी दिली आहे. “आळंदीतील प्रत्येक समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढू. केवळ एकदा नगराध्यक्ष करा, आळंदीचा कायापालट करून दाखवीन,” असा ठाम शब्द त्यांनी सभेत व्यक्त केला.
जाहीरनाम्यात शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज लाईन, वाहतूक व्यवस्था, स्ट्रीटलाईट्स, आरोग्य सुविधा, तसेच पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उभारण्याचे अनेक मोठे प्रकल्प समाविष्ट आहेत.
शहराचा चेहरा बदलण्यासाठी ११७ कोटींपेक्षा अधिक निधीच्या विविध कामांची ग्वाही देत त्यांनी विकासाला प्रथम प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.
कुराडे यांनी घराघरांत प्रचार करताना नागरिकांना “घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबा आणि मला प्रचंड मतांनी विजयी करा,” असे आवाहन केले. शहरातील प्रभागांमधील उमेदवारांसह त्यांनी मोर्चेबांधणी केली असून जनता उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे.
जाहीरनाम्यातील महत्वाची कामे —
• मुख्य रस्त्यांचे कॉंक्रिटिकरण
• ड्रेनेज व गटारांच्या समस्या कायमस्वरूपी सोडविणे
• स्ट्रीटलाईट पोल आणि उजेडव्यवस्था मजबूत करणे
• शहरात स्वच्छता यंत्रणा अत्याधुनिक बनवणे
• धार्मिक पर्यटनवाढीसाठी पायाभूत सुविधा उभारणे
• आळंदीच्या भविष्यासाठी दीर्घकालीन विकास आराखडा
“आळंदीला आदर्श आणि आधुनिक स्वरूप देणे हे माझे ध्येय आहे. शहराचा सर्वांगीण विकास करा एवढीच जनता विनंती करते, आणि ती विनंती पूर्ण करण्याची क्षमता माझ्यात आहे,” असे कुराडे म्हणाले.
घड्याळ चिन्हावर एकजुटीने मतदान करून आळंदीच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझा हात बळकट करा, असे आवाहन करत त्यांनी निवडणूक प्रचार अधिक तीव्र केला आहे.



