बीड

घुंडरे दाम्पत्याचा विकास-अभियान रणवेगात “नवी आळंदी – सुशिक्षित, सुरक्षित आणि सक्षम” नागरिकांचा भाजप उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा

घुंडरे दाम्पत्याचा विकास-अभियान रणवेगात

“नवी आळंदी – सुशिक्षित, सुरक्षित आणि सक्षम” नागरिकांचा भाजप उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा

आळंदी / प्रतिनिधी:-आळंदी नगरपरिषद निवडणूक 2025/26 तोंडावर येताच भाजपचा प्रचार जोरदार गतीत असून प्रभाग क्रमांक 7 मधील श्री. सचिन रामकृष्ण घुंडरे आणि प्रभाग क्रमांक 1A (मागास प्रवर्ग – महिला) मधील सौ. ज्योतीताई अक्षय घुंडरे यांच्या उमेदवारीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण आळंदीत पदयात्रा, घरभेटी व संवादसभांमुळे भाजपचा प्रचार सर्वदूर पोहचला आहे.

धर्मनगरी आळंदीला आधुनिक आणि सुशिक्षित शहरात रूपांतरित करण्याचा संकल्प घुंडरे दाम्पत्याने जाहीर केला असून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि पर्यटनवाढ यांसारख्या विषयांवर त्यांनी ठोस कार्यक्रम मांडले आहेत. CBSE पद्धतीच्या शाळा, डिजिटल शिक्षण सुविधा, मोफत शिक्षणसाहित्य, विद्यार्थ्यांसाठी नवी साधनसामग्री, महिला बचतगटांना प्रोत्साहन, सुरक्षित सार्वजनिक स्थळे, ज्येष्ठ–दिव्यांगांसाठी विशेष सेवा केंद्रे अशा उपक्रमांचा समावेश आहे.
सचिन घुंडरे यांनी शहराच्या शैक्षणिक गुणवत्तेवर लक्ष ठेवत “आळंदीतील प्रत्येक मुलाला दर्जेदार, तंत्रज्ञानाधारित आणि परवडणारे शिक्षण देणे हा आमचा संकल्प” असे सांगितले. तर सौ. ज्योतीताई घुंडरे यांनी महिला सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य, रोजगार निर्मिती आणि प्रसूति–कल्याण योजना प्राधान्याने राबवण्याची भूमिका स्पष्ट केली. “महिलांच्या सुरक्षेला असलेले धोक्याचे बिंदू हटवण्यासाठी सीसीटीव्ही नेटवर्क आणि सुरक्षित सार्वजनिक सुविधा उभारू,” असे त्या म्हणाल्या.
दोन्ही उमेदवारांनी नागरिकांच्या तातडीच्या मूलभूत समस्या — रस्त्यांची दुरुस्ती, गटार व्यवस्था, स्थिर पाणीपुरवठा, वाहतूक नियंत्रण, कचरा व्यवस्थापन आणि संत वारी–धार्मिक पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा — यावर त्वरित काम करण्याची हमी दिली. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जपत आधुनिक स्वरूपाची “नवी आळंदी” घडवण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
भाजप नेते संजय त्रिंबक घुंडरे पटील यांच्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला असून युवक, महिला, व्यावसायिक व सामाजिक संस्थांमधून या दोन्ही उमेदवारांना मोठे समर्थन मिळत आहे.
निवडणुकीचे मतदान 02 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून प्रभाग 7 मधील श्री. सचिन घुंडरे आणि प्रभाग 1A मधील सौ. ज्योतीताई अक्षय घुंडरे यांना विजयी करावे, असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले.

Back to top button