📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

15 ते 18 जून भव्य राज्यस्तरीय सांप्रदायिक कीर्तन महोत्सव

15 ते 18 जून भव्य राज्यस्तरीय सांप्रदायिक कीर्तन महोत्सव

बीड (प्रतिनिधी):- स्व.झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान बीडच्यावतीने 15 ते 18 जून 2026 या कालावधीत भव्य राज्यस्तरीय सांप्रदायिक कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील 8 सांप्रदायिक कीर्तनकार आपली सेवा देणार आहेत.
संपूर्ण राज्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरुन पंढरपूर पायी दिंडी सोहळा आयोजित करण्याची लगबग सुरु आहे. विविध पध्दतीने हा सोहळा अतिशय देखणा व्हावा यासाठी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सर्व भाविक-भक्त प्रयत्न करीत असतात. त्याच अनुषंगाने हा कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.
गत 25 वर्षाचा अनुभव पाठीशी असल्यामुळे अतिशय आगळ्या-वेगळ्या पध्दतीने सुनियोजित असा हा कीर्तन महोत्सव बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे वेगवेगळ्या दोन सत्रामध्ये कीर्तनकारांच्या मुलाखती व सांप्रदायिक कीर्तने अशा आगळ्या-वेगळ्या पध्दतीचा कीर्तन महोत्सव चार दिवस संपन्न होणार आहे. बीड शहरातील सर्व भाविक-भक्तांना अवाहन करण्यात येते की, आपण या कीर्तन महोत्सवाचा सहकुटूंब सहपरिवार लाभ घ्यावा असे आवाहन स्व.झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान बीडच्यावतीने करण्यात आले आहे.

Back to top button