बीड

डिप्लोमा काॅलेज येथे जर्मनीतील विपुल डहाळे यांचे इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

डिप्लोमा काॅलेज येथे जर्मनीतील विपुल डहाळे यांचे इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

स्वप्नांचा पाठलाग करा, काळासोबत स्वत:ला सुसंगत ठेवा- विपुल डहाळे

जामखेड : विद्यार्थ्यांनी काळाच्या प्रवाहासोबत स्वत:ला सुसंगत ठेवले पाहिजे. ध्येय निश्चित करून त्यासाठी झटल्यास यश अटळ आहे. आजचे युग हे स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांनी स्वप्नांचा पाठलाग करून त्यांची पूर्तता करण्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत, असे प्रतिपादन जर्मनीतील अलकेन केमिकल कंपनीचे परचेस मॅनेजर व जामखेडचे भूमिपुत्र विपुल डहाळे यांनी केले.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे व्यवसाय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते बोलत होते.
यावेळी डहाळे यांनी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना विदेशातील नोकरीच्या संधी, आवश्यक कौशल्ये व तयारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना प्राचार्य विकी घायतडक यांनी सांगितले की,विद्यार्थ्यांनी आजच्या बदलत्या काळाशी जुळवून घेतले पाहिजे. विदेशातील संधींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करून आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे. विपुल डहाळे यांनी आपल्या अनुभवातून दिलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

यावेळी डिप्लोमा काॅलेज चे प्राचार्य विकी घायतडक होते. विपुल डहाळे यांचे वडील उदय डहाळे, डिप्लोमा काॅलेज चे अधिक्षक संतोष डहाळे,प्रा. किशोर हुंबे, प्रा. जयसिंग पवार, प्रा. विजय कोकाटे, प्रा. पूनम कांबळे, प्रा. प्रियांका पवार, प्रा. शुभदा भोज, प्रा. माधुरी म्हेत्रे, प्रा. आश्विनी पोटफोडे, वरिष्ठ लिपिक सविता सुतार, लिपिक संतोष जगताप,प्रतिक उदारे,सौरभ पवार आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

Back to top button