बीड

मृग नक्षत्राच्या पाऊसधारा बरसल्याने गेवराई तालुक्यात पेरण्यासाठी  येणार वेग 

मृग नक्षत्राच्या पाऊसधारा बरसल्याने गेवराई तालुक्यात पेरण्यासाठी  येणार वेग
पाऊस न पडल्याने काही शेतकरी प्रतिक्षेत
कोळगांव :- दि.११ (बाळासाहेब घाडगे) :- गेवराई तालुक्यात मृग नक्षत्रांच्या पुर्वसंध्येला परिसरात दोन तीन दिवसापासून पावसाला सुरूवात झाली. सोमवार बुधवार रोजी परिसरात पावसाच्या सरी चांगल्याच बरसल्याने खरीप हंगामातील पिकाच्या पेरणीला वेग येणार असून पेरणीला चांगलाच आधार मिळाला आहे. जेथे पाऊस झाला तेथे कभी खुशी आणि जेथे पाऊस झाला नाही तेथे मात्र शेतकरी पाऊसाच्या प्रतिक्षेत आहे.
      गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात मान्सून पुर्व म्हणजे मे महिन्यात अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस पडला. यामुळे मशागतीची कामे खोळंबली होती. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार चांगला पाऊस पडेल यानूसार शेतकरी तयारीत लागला होता. दरम्यान दि.०७ जून म्हणजे मृग नक्षत्राच्या पुर्वसंध्येला मान्सून ची चाहूल अन् ढसाळ वातावरण आभाळ भरून आल्याने शेतकरी सर्जा राजा बैल औत मोगडा, पाळी कामावर वेग घेतला होता. दरम्यान दि.१०, ११ जून रोजी चांगलाच पाऊस पडला. या मध्ये  मादळमोही, सिरसमार्ग, चकलांबा, कोळगांव, बंगाली पिंपळा, तांदळा, काजळा, तिंतरवणी , सिंदफणा पट्ट्यातील साक्षरप्रिंपी नारायणगड परिसरातील गावात मृग नक्षत्राचा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे चांगलेच पोषक वातावरण आहे.  मागील पंधरवड्यात म्हणजेच रोहिणी नक्षत्रात तालुक्यात काही स्वरूपात पाऊस सरी झाल्या. सध्या या झालेल्या पावसावरच शेतकऱ्यांनी कपाशी पेरणी लावण्या वेग धरला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीसाठी आणि पेरणी बाजरी, सोयाबीन, तूर करिता धावपळ सुरू आहे. दोन तीन दिवसांपासून पावसाच्या सरीवर सरी कोसळल्याने परिसरातील पिकांना चांगलाच आधार मिळाला आहे.
………………… चौकट
शेतकऱ्यांना जास्त पावसाची वाट…
      सध्या बीड जिल्ह्यासह गेवराई तालुक्यात मान्सूनचा पाऊस काही भागात पडत असल्याने शेतकरी वर्गात कभी खुशी कभी गम याप्रमाणे झाल्यासारखे असून आता शेतकऱ्यांला पेरणीची उगवण आणि वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची वाट आहे. त्यामुळे शेतक-यांचा डोळा आभाळाकडे लागला असुन शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. प्रत्येक हंगामात सालाबादप्रमाणे चांगला पाऊस न पडल्याने पेरण्या, लागवडी योग्य वेळी होत नाही. तसेच नेहमीप्रमाणे हवामान खात्याचे अंदाज खोटा ठरतो.
……… चौकट
शासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज….
      खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागत करून शेतकरी पेरणी करीत असतो. यामध्ये शेतकऱ्यांनी आता जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी बि बियाणे, खते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतात. याचबरोबर नव्या वर्षाची पेरणी वेळेवर होण्यासाठी नुकसान होऊ नये यासाठी सरकारच्या वतीने शेती संदर्भातील आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार बि बियाणे, खते औषधे, याचबरोबर शासनाने आणि कृषी विभागाच्या वतीने हवामान अंदाजपत्रक, पिकसल्ला, मार्गदर्शन प्रगत करून मदत देण्याची गरज याचबरोबर शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.
Back to top button