शेतकऱ्यांची कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मा.बच्चु भाऊ कडु यांच्या अन्नत्याग आंदोलनाला लिंबागणेशकरांचा पाठिंबा :- डॉ.गणेश ढवळे

शेतकऱ्यांची कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मा.बच्चु भाऊ कडु यांच्या अन्नत्याग आंदोलनाला लिंबागणेशकरांचा पाठिंबा :- डॉ.गणेश ढवळे
—-
लिंबागणेश:-( दि.१४ ) शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफीसह , शेतीमालाला हमीभाव, शेतमजूर,दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी, विविध प्रश्नासंदर्भात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चु भाऊ कडु यांचे राष्ट्रसंतांच्या महासमाधीपुढे गुरूकुंज मोझरी येथे गेल्या ७ दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू असुन बच्चु कडु यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे कटु सत्य असुन शेतमालाला भाव नाही, राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत.सत्ताधा-यांनी निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही.आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हताश होऊन टोकाचे पाऊल उचलुन आपले जीवन संपवत आहे. अवकाळी झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही.जगाचा पोशिंदा बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे मा.बच्चु भाऊ कडु यांच्या समर्थनार्थ आज दि.१४ शनिवार रोजी सकाळी लिंबागणेशकरांनी मुख्य प्रवेशद्वार याठिकाणी बच्चु भाऊ कडु यांच्या समर्थनार्थ व शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे ” शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण” अशी घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीसह प्रमुख मागणीसह ईतर मागण्या मान्य करून बच्चु भाऊ कडु यांच्या जिवीतास धोका असुन परिस्थिती चिघळण्या अगोदरच बेमुदत आमरण उपोषण सोडवण्याची मागणी करत बच्चु भाऊ कडु यांना ईमेल द्वारे आपला पाठिंबा दर्शविला आहे. निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवले आहे.यावेळी राजेभाऊ गिरे, भिम टायगर ग्रुपचे बीड जिल्हाध्यक्ष रविंद्र निर्मळ, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, ऑल इंडिया पँथर सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष नितिन सोनावणे, विक्रांत वाणी, रामकिसन गिरे, संतोष भोसले, सय्यद अख्तर, सुरेश निर्मळ,आरूण निर्मळ, राहुल जाधव, तुकाराम गायकवाड, रामदास मुळे, अर्जुन गोंडे,आश्रुबा गिरे, भगवान मोरे, रामकिसन गिरे,लहु घोलप, दत्ता घरत, तुषार गायकवाड,शहाजी वाणी, भालचंद्र गिरे,लहु घोलप आदी सहभागी होते.



