बीड
मादळमोही अर्बन बँकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली….

मादळमोही अर्बन बँकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली….
कोळगाव बाळासाहेब घाडगे – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे दि.२८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन मनाला चटका लावून गेले आहे. यावेळी त्यांच्या या दुदैवी निधनामुळे राजकारणात मोठी हानी झाली असून त्यांच्या विषयी सर्व स्तरातून शोकसभेतून भावना व्यक्त करत आहेत. दरम्यान गेवराई तालुक्यातील मादळमोही अर्बन बँकेत दि.०४ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मा.अजित दादा पवार यांनी मादळमोही जिल्हा परिषद सर्कल मध्ये दुष्काळ परिस्थितीत चारा छावण्या आणि फळबागेची पाहणी केली होती. अश्या यांच्या कार्याची माहिती ओळख, वर्णन करण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. संदिप आंधळे, संचालक सचिन तळेकर, अशोक पायघडे, परमेश्वर घाटे, अक्षय तळेकर, शेख सर, काचोळे सर, शाखेचे व्यवस्थापक श्री.फुलझळके सर, जगताप सर, याचबरोबर बँकेचे खातेदार शेतकरी नागरिक उपस्थित होते.



