बीड

डॉ.संपदा मुंडेंच्या आत्महत्या प्रकरणात  दोषींना कठोर शिक्षा व्हावी:पप्पू कागदे

डॉ.संपदा मुंडेंच्या आत्महत्या प्रकरणात
दोषींना कठोर शिक्षा व्हावी:पप्पू कागदे
बीड/प्रतिनिधी:-सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेली बीडची कन्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा देऊन संपदाला न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी युवा रिपाइं (आ) प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केली आहे.
पप्पू कागदे म्हणाले, “डॉ. संपदा मुंडे ही बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगावसारख्या ग्रामीण भागातील होती. अतिशय हालकीच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न साकारले. अशा मेहनती, जिद्दी आणि सेवावृत्ती कन्येवर अन्याय झाला, हे समाजासाठी लज्जास्पद आहे.”“संपदा ही केवळ एक डॉक्टर नव्हती, तर ती अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान होती. तिच्या आयुष्याचा अंत करण्यास कारणीभूत असणाऱ्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. महिलांवरील अत्याचार थांबवायचे असतील, तर अशा प्रकरणांमध्ये योग्य निर्णय होणे गरजेचे आहे.” त्यांनी सरकारकडे मागणी केली की, या प्रकरणातील आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवावा, जेणेकरून संपदाला न्याय मिळेल. पप्पू कागदे यांनी इशारा दिला की, “डॉ. संपदाला न्याय मिळाल्याशिवाय रिपाइं शांत बसणार नाही. आवश्यक असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.” दरम्यान, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह सर्वसामान्य जनतेत तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून समाजाने एकजुटीने “संपदाला न्याय” मिळवण्यासाठी पुढे यावे, अशी भावना  पप्पू कागदे यांनी व्यक्त केली.

Back to top button