📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

विठ्ठल रुक्मिणी मंदिर जालना येथे श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचे भव्य आयोजन

विठ्ठल रुक्मिणी मंदिर जालना येथे श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचे भव्य आयोजन
कथा प्रवक्ते बबन देवा जोशी महाराज
बीड प्रतिनिधी:-जालना शहरातील यशवंत नगर  विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे कार्तिक मास उत्सव व काकडा भजन  सांगता निमित्ताने श्रीमद् भागवत कथा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा  विशेषतः कार्तिक एकादशी आणि काकडा भजन सांगता निमित्ताने पार पडणार आहे.

या भागवत कथा सोहळाचे कथा प्रवक्ते ह. भ. प. बबन देवा जोशी महाराज (बीड) यांच्या मधुर वाणीतून पार पडणार असून, भक्तांना श्रीमद् भागवताच्या अद्भुत कथानकांचा आणि अध्यात्मिक संदेशांचा लाभ घेता येईल. कथा सोहळा ३० ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) पासून ५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आयोजित केला आहे.

कथा वेळ रोज दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या पवित्र सोहळ्याचा मुख्य उद्दिष्ट भक्तांमध्ये अध्यात्मिक जागरूकता वाढवणे, धार्मिक संस्कृतीचा प्रसार करणे आणि समाजातील शांतता व एकात्मतेला प्रोत्साहन देणे आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, अंबड रोड, जालना येथे आहे. या ठिकाणी सहभागी होणारे भक्त कथा ऐकताना केवळ धार्मिक आनंद मिळवतील असे नाही, तर श्रीमद् भागवतामधील तत्वज्ञानाचा सखोल अनुभवही घेऊ शकतील.

आयोजक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम प्रेमींनी या सोहळ्यात नक्की उपस्थित राहावे, आणि या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन अध्यात्मिक शांतीचा अनुभव घ्यावा असे आवाहन आयोजक विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टी यशवंत नगर जालना यांनी केले आहे

Back to top button