📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

राष्ट्रवादी शरद पवार गटाने‘ भाजपाची बी टीम’ म्हणून काम करु नये – आम आदमी पक्ष कार्यकरणीचा सवाल?

राष्ट्रवादी शरद पवार गटाने‘ भाजपाची बी टीम’ म्हणून काम करु नये – आम आदमी पक्ष कार्यकरणीचा सवाल?

आ.पवारांनी मनाचा मोठेपणा दाखवावा !

जामखेड,दि.२६(प्रतिनिधी) : आगामी जामखेड नगर परिषद निवडणुकीत आम आदमी पक्षाने अल्पसंख्याक समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील युवा नेते शेख आसिफ कमाल यांच्या मातोश्री शेख रहिमुन्निसा कमाल यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात प्रथमच अल्पसंख्याक समाजातील महिलेला नगराध्यक्ष पदासाठी संधी देत आपने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.आजची देशातील अल्पसंख्याक म्हणजेच मुस्लिम समाजाची परिस्थिती पाहता राजकारणाच्या पलीकडे अल्पसंख्याक समाजाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठा प्रयत्न म्हणून काम करणार आहे.
आम आदमी पक्षाने पूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला जाहीर पाठिंबा दिला होता.पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांनी देखील पक्षीय भेद विसरून जामखेड येथे आमदार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती.

जामखेड शहरात आम आदमी पक्ष व अल्पसंख्याक समाजाने एकत्र येत आमदार रोहित पवार यांना मतांची भक्कम आघाडी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. या पार्श्वभूमीवर आपच्या कार्यकारिणीने अपेक्षा व्यक्त केली आहे की, आमदार रोहित पवार यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आम आदमी पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा द्यावा.

आम आदमी पक्षाचे तालुका कार्यकर्ते म्हणाले की, आमची लढाई ही भाजपाविरोधात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी अल्पसंख्याक समाजातील उमेदवाराला अडचणीत आणणारी भूमिका न घेता सहकार्य करावे. अन्यथा भाजपाची बी-टीम म्हणून काम करु नये.अशी भूमिका आम आदमी पक्षाच्या तालुका कार्यकारिणीने केली आहे.

Back to top button