डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगड ची विद्यार्थिनी कुमारी सिद्धी कासारे हिचे प्रबोधन विचार मंच, मंडणगड यांच्याकडून अभिनंदन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगड ची विद्यार्थिनी कुमारी सिद्धी कासारे हिचे प्रबोधन विचार मंच, मंडणगड यांच्याकडून अभिनंदन
मंडणगड प्रतिनिधी
इयत्ता दहावी मध्ये संपूर्ण मंडणगड तालुक्यात ९७.२० टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळवणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल मंडणगड ची विद्यार्थिनी कुमारी सिद्धी जितेंद्र कासारे ( गाव : शिरगाव ) हिचे प्रबोधन विचार मंच, मंडणगड यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले…
याप्रसंगी प्रबोधन विचार मंचाचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी आयु.विशाल जाधव साहेब, सल्लागार मार्गदर्शक आयु.रजनीकांत धोत्रे साहेब, माजी नगरसेवक तथा उद्योजक आयु.राजेशजी मर्चंडे, शिक्षक प्रदीप कांबळे आणि श्रीकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते…
सिद्धीला तिच्या या उज्वल यशाबद्दल अभिनंदन करतानाच भावी वाटचालीसाठी ही मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या..!
बहुजन समाजाची उच्च शिक्षणातील टक्केवारी वाढायला हवी या दिशेने टाकलेलं आश्वासक पाऊल म्हणजे सिद्धीचे हे यश आहे…
पुनश्च सिद्धीचे प्रबोधन विचार मंच परिवाराकडून मनापासून अभिनंदन आणि अनंत शुभेच्छा देण्यात आल्या.



