श्री स्वामी समर्थ उपासक मंडळ दादर यांच्या कशेडी येथील स्वामी समर्थ महाराज मठात प्रकट दिन होणार साजरा

श्री स्वामी समर्थ उपासक मंडळ दादर यांच्या कशेडी येथील स्वामी समर्थ महाराज मठात प्रकट दिन होणार साजरा
प्रतिनिधी
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी स्वामी समर्थ उपासक मंडळ व स्वामी साधक यांच्याकडून अतिशय आनंदात स्वामीनामाच्या जयघोशात प्रकट दिन साजरा होत आहे.सदर कार्यक्रमाला सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रम शोभा वाढवावी. रविवार दिनांक ८ मार्च २०२६ ते बुधवार दिनांक 18 मार्च 2026 पर्यंत सायंकाळी 4 ते 7 वाजता श्री गुरुलीलामृत ग्रंथाचे पारायण होणार आहे. गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी ग्रंथ समाप्ती भंडारा होणार आहे. शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 7 ते 9.30 श्री गणेश पूजन दुग्धाभिषेक, आरती, तसेच सकाळी 9.30 ते 10.00 अल्पोहार व चहा सकाळी 10 ते 12 वाजता गुरुदत्त प्रासंगिक भजन मंडळ देशमुख कांबळे, तालुका महाड गुरुवर्य रायगड भूषण कै. विलास बुवा देशमुख यांचे शिष्य सुप्रसिद्ध भजनकार श्री सुजित बुवा देशमुख यांचे सुस्वर भजन पखवाज वादक अजित देशमुख तबलावादक साहिल देशमुख तसेच दुपारी 1.05 ते 1.30 वाजता श्री स्वामी महाराज महाआरती तसेच दुपारी 01:30 वाजता महाप्रसाद (भंडारा) दुपारी 3 ते 4 वाजता श्रीकृष्ण महिला भजन मंडळ भडगाव, उसरेवाडी यांचे सुस्वर भजन होणार आहे. 4.30 ते 5.30 वाजता श्री स्वामी महाराज पालखी मिरवणूक होणार आहे. सायंकाळी 6 ते 7.30 जय बजरंग महिला मंडळ, कुंभार आळी विन्हेरे यांचे हरिपाठ तसेच सायंकाळी 7:30 वाजता आरती होणार आहे. यानंतर रात्री आठ वाजता महाप्रसाद (भंडारा) होणार आहे. तरी सर्व भाविकांनी स्वामी दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन विश्वस्त श्री स्वामी समर्थ उपासक मंडळ दादर यांच्याकडून करण्यात आले आहे.



