पिंटूशेठ बोरा यांची भाजप व्यापारी आघाडी प्रमुखपदी निवड

पिंटूशेठ बोरा यांची भाजप व्यापारी आघाडी प्रमुखपदी निवड
प्रा.राम शिंदे यांचे अभिनंदनपत्र : नेतृत्वगुण आणि संघटनकौशल्याची पावती
जामखेड प्रतिनिधी :
जामखेड शहरातील प्रसिद्ध व्यापारी मा.श्री.निलेश उर्फ पिंटूशेठ गोकुळदास बोरा यांची भारतीय जनता पार्टी, जामखेड शहर मंडळ कार्यकारिणीमध्ये व्यापारी आघाडी प्रमुख या महत्त्वपूर्ण पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल शहरासह संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शहरातील व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि संघटनेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणारे पिंटूशेठ बोरा हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी वर्गाचे विश्वासू आणि कार्यक्षम प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर(आबा) राळेभात यांचे ते खंदे समर्थक आहेत.
निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना बोरा यांनी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे साहेब आणि शहर मंडळ अध्यक्ष संजय काशिद यांचे मनःपूर्वक आभार मानले.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी बोरा यांना अभिनंदनपर पत्र पाठवले असून त्यात म्हटले आहे की,आपले नेतृत्वगुण, दूरदृष्टी, संघटनकौशल्य व समाजसेवेतील सातत्यपूर्ण योगदान या सगळ्यांचीच ही पावती आहे. पक्षनेतृत्वाने आपणावर दाखवलेला विश्वास संघटन बळकटीसाठी व जनहितासाठी निश्चितच प्रभावी ठरेल. आपण पक्षविस्तार, कार्यकर्त्यांचे संघटन व जनतेच्या अपेक्षांची पूर्तता या तिन्ही बाबींमध्ये यशस्वी व्हाल असा मला विश्वास आहे.
या निवडीमुळे शहरातील व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण असून पिंटूशेठ बोरा यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी आघाडी अधिक सक्षम होईल, असा विश्वास स्थानिक व्यापारीवर्ग व्यक्त करत आहे.



