बीड

प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नारायण राऊत तर जिल्हा उपाध्यक्षपदी नानासाहेब मोरे यांची निवड

प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नारायण राऊत तर जिल्हा उपाध्यक्षपदी नानासाहेब मोरे यांची निवड

जामखेड प्रतिनिधी;-अहिल्यानगर येथे दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी प्राथमिक शिक्षक संघ अहिल्यानगर चे त्रैवार्षिक अधिवेशन पार पडले. राज्याचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपनेते रावसाहेब रोहकले ,प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप ,राज्य संपर्क प्रमुख संजय कळमकर यांच्या उपस्थित त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न

झाले .यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली असून अहिल्यानगर जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी माजी व्हाईस चेअरमन नारायण राऊत यांची तर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी प्राथमिक शिक्षक संघाचे जामखेड तालुका अध्यक्ष नानासाहेब मोरे यांची निवड करण्यात आली.या निवडीमुळे संघाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यास संधी दिल्याने संघ कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
या संघ निवडीमुळे केंद्रप्रमुख संघटना राज्य सरचिटणीस राम निकम, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक संतोष राऊत,शिक्षक नेते किसन वराट, दत्तात्रय यादव, शिवाजी हजारे,नवनाथ बहिर,नारायण लहाने,उपेंद्र आढाव, मल्हारी पारखे,अभिमान घोडेस्वार,रामहरी बांगर,सुनील कुमटकर, राम ढवळे,अरुण मुरूमकर,महेश मोरे,श्रीकृष्ण बोराटे, अर्चना भोसले मॅडम आदींनी अभिनंदन केले आहे.

Back to top button