बीड

ल.ना. होशिंग विद्यालय येथे ” लेखक आपल्या दारी उपक्रमास मोठा प्रतिसाद

ल.ना. होशिंग विद्यालय येथे ” लेखक आपल्या दारी उपक्रमास मोठा प्रतिसाद

भविष्यात “पंचभाऊ’ या पुस्तकाचे हिंदी, इंग्रजी भाषेत भाषांतर व्हावे – प्राचार्य बाळासाहेब पारखे

जामखेड प्रतिनिधी;-आई व वडील यांच्या संस्कारातून व अंतःकरणातून जी कृती बाहेर येते.मला जे दिसलेले आहे,या जगामध्ये ,ते‌ माझ्या मुलाला जास्त दिसावे म्हणून वडील मुलाला खांद्यावर घेत असतात.संपूर्ण जगाचे निरिक्षण माझ्यापेक्षा मुलाने जास्त करावे. वडिलांचा वारसा हाच उद्देश ठेवून एकनाथ चव्हाण यांनी “पंचभाऊ’ या कथा संग्रहाचे निर्माण केले.भविष्यात “पंचभाऊ’ या पुस्तकाचे हिंदी, इंग्रजी भाषेत भाषांतर व्हावे तसेच चव्हाण यांच्या साहित्याला धार यावी.असा विश्वास प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी व्यक्त केला.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल.ना. होशिंग विद्यालय येथे”लेखक आपल्या दारी व महावाचन’ या उपक्रमांतर्गत ‘पंच’ भाऊ या कथासंग्रहाचे लेखक एकनाथ चव्हाण ( आदर्श शिक्षक -प्राथमिक शिक्षक) यांच्या पुस्तकाचे ल.ना.होशिंग विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकाच वेळेस महावाचन केले .यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ म्हणाले की,तुमच्या ठिकाणी बसून शिक्षण घेणारे एकनाथ चव्हाण याच शाळेत घडले आहेत.या शाळेचा विद्यार्थी उत्कृष्ट पध्दतीचे लिखाण करुन लेखक होऊ शकतो तर तुमच्यामधून याच शाळेचा विद्यार्थी लेखक, डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, साहित्यिक होऊन असे खूप मोठे अपेक्षित कार्य होणे आवश्यक आहे.लेखक एकनाथ चव्हाण यांची प्रेरणा घेऊन वाचन संस्कृती जपण्यासाठी विद्यार्थी जिवनात अभ्यास करून भविष्यात मोठ्या पदावर जायचे आहे.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ,विद्यालयाचे उपप्राचार्य सादिक शेख, उपमुख्याध्यापक प्रविण गायकवाड, कैलास वराट,अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे विश्वस्त मुकुंदराज सातपुते , संगिता दराडे व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सरांच्या ” पंचभाऊ ‘ या कथेविषयी मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य सादिक शेख, उपमुख्याध्यापक प्रविण गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने, कलाशिक्षक मुकुंद राऊत,भरत लहाने, बाबासाहेब समुद्र, कैलास वराट,विशाल पोले,राघवेंद्र धनलगडे, आदित्य देशमुख,बापू जरे, साईराज भोसले आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी,विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एनसीसी विभाग प्रमुख अनिल देडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक प्रविण गायकवाड यांनी मानले.

Back to top button