📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

प्रा. मधुकर राळेभात मित्र परिवाराच्या वतीने इफ्तार चे आयोजन

प्रा. मधुकर राळेभात मित्र परिवाराच्या वतीने इफ्तार चे आयोजन

सौहार्दाचा संदेश! जामखेडमध्ये २४ मार्च रोजी सामूहिक इफ्तार पार्टी

जामखेड प्रतिनिधी – रमजान महिन्यानिमित्त जामखेडमध्ये जेष्ठ नेते प्रा. मधुकर( आबा )राळेभात मित्र परिवाराच्या वतीने सामूहिक इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, २४ मार्च २०२५ रोजी मस्जिद (कब्रस्तान), जामखेड येथे हा धार्मिक व सामाजिक सलोखा वाढवणारा उपक्रम पार पडणार आहे.

रमजान हा पवित्र महिना संयम, श्रद्धा आणि बांधिलकीचे प्रतीक मानला जातो. याच भावनेतून, प्रा. मधुकर (आबा)राळेभात मित्र परिवाराने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात शहरातील विविध मान्यवर, धार्मिक नेते आणि स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत.

या उपक्रमाच्या निमित्ताने सर्वधर्मीय एकता आणि बंधुत्वाचा संदेश दिला जात असून, सर्व मुस्लिम रोजदार बांधवांनी या सामूहिक इफ्तारला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Back to top button