📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत म्हणजे विकासाला मत, अजित दादा पवार मागील तीस वर्षाचा विकासाचा अनुशेष पूर्ण करणार – आ. विजयसिंह पंडित 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत म्हणजे विकासाला मत, अजित दादा पवार मागील तीस वर्षाचा विकासाचा अनुशेष पूर्ण करणार – आ. विजयसिंह पंडित
बीड प्रतिनिधी: बीड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मोमीनपुरा भागातील मक्का मस्जिद चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक 22 व 23 व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेम लता दादासाहेब पारवे व नगरसेवक पदा उमेदवार शेख निजाम जैनुद्दीन,शबाना खय्युम इनामदार,मोमीन जुबेर, बिस्मिल्ला बेगम, यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले होते सदरील सभेमध्ये बोलताना विजयसिंह पंडित यांनी असे म्हटले की शिवाजीराव पंडित कौटुंबिय व शिवछत्र परिवार यांनी कधीही बीडच्या राजकारणामध्ये रस घेतला नाही परंतु एका कुटुंबाने मागील 35 ते 40 वर्षापासून बीडमध्ये खासदारकी आमदारकी नगराध्यक्ष तथा अनेक मानाचे पदे भोगून सुद्धा कार्यकर्त्यांच्या निवडणुकी वेळी ऐनवेळी लोकांच्या विश्वासाला तडा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला ऐनवेळी पक्षाने बीड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणुकीची जबाबदारी आमच्यावर दिली बीड शहरातील सर्व सुजान जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्ह समोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना बहुसंख्येने बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत म्हणजे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री अर्थमंत्री पालकमंत्री यांना मत आहे आणि अजित दादा पवार यांना मत म्हणजेच विकासाला मत आहे असे प्रतिपादन केले यावेळी सदरील भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते विजयसिंह पंडित यांच्या सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील वातावरण बनलेले आहे
चौकट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक समाजाला न्याय देणारा पक्ष — गफ्फार कादरी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गफार कादरी यांनी अजित दादा पवार हे सर्वधर्मसमभाव मांडणारे नेते असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याची भूमिका नेहमीच मांडत आलेला असून अल्पसंख्यांक समाजाला अजित दादा पवार यांनी नेहमीच झुकते माप दिलेले असून अल्पसंख्याक समाजाच्या सर्वच प्रश्नांना न्याय देण्याचे काम अजित दादा पवार करत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले
चौकट
मोमीनपुरा माझे होम ग्राउंड म्हणणाऱ्यांनी मोमीनपुरा भागाचा व अल्पसंख्यांक बहुल भागाचा विकास केला का? मुस्लिम समाजाची फक्त मतेच घ्यायची का? – भागवत तावरे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भागवत तावरे यांनी उपस्थित जनसमुदायास संबंधित करताना मागील लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार व सध्याचे आमदाराला स्वयंस्फूर्तीने एकतर्फी मतदान करून निवडून दिले परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी अल्पसंख्यांक समाजाकडे पाठ फिरवलेली आहे अल्पसंख्यांक समाजाच्या मतावर आपले राजकारण करणारे लोकांना आतापर्यंत फक्त मुस्लिम समाजाची आठवण निवडणुकी पुरती येते परंतु नंतर त्यांच्या मूलभूत प्रश्नावर त्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर फक्त आश्वासनांची खैरात देण्याचे काम आजपर्यंत झालेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माननीय नामदार अजित दादा पवार यांना निवडून दिल्यास अल्पसंख्यांक बहुल भागातील विकास कामे लवकरात लवकर पूर्ण होतील व सर्व समाजाला न्याय देण्याची काम अजित दादा पवार यांच्या माध्यमातून होणार असल्याचे भागवत तावरे यांनी मांडले
चौकट
गुंड प्रवृत्ती व नशा खोरी थारा देऊ नका …
मोमीनपुरा, मोहम्मदिया कॉलनी, मिल्लत नगर अख्तर नगर गांधीनगर भागातील विकास कामे करून घ्यायची माझी जबाबदारी – शेख निजाम
मोमीनपुरा मोहम्मद कॉलनी गांधीनगर अख्तर नगर दिलावर नगर भागातील अल्पसंख्याक समाजाने नेहमीच एक गठ्ठा मतदान बीडच्या क्षीरसागर कुटुंबीयांना केलेले आहे मागील 35 वर्ष त्यांना एक हाती सत्ता दिल्यानंतर सुद्धा त्यांनी अल्पसंख्याक समाजाचा फक्त मतांच्या पुढचा वापर करून त्यांच्या प्रभागाचा कोणताही विकास केलेला नाही आजही सदर प्रभागांमध्ये अनेक मूलभूत व पायाभूत सुविधा नसल्याने त्या भागातील नागरिकांना विकासापासून वंचित राहावे लागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजित दादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे यांना कोणाच्याही शिफारसीची गरज नसल्यामुळे त्यांनी सांगितलेले सर्वच विकास कामे दादांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत म्हणजे थेट विकासालाच मत होणार असल्यामुळे बीड शहरातील सुजाण जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच आपले अमूल्य मतदान करून विकासालाच संधी द्यावी व होम ग्राउंड म्हणणाऱ्यांना आपली जागा दाखवावी व मोमीनपुरा अख्तर नगर गांधीनगर मोहम्मदया कॉलनी या भागातील विकास कामे करून घ्यायची जबाबदारी माझी राहील असे शेख निजाम यांनी म्हटले
सदरील जाहीर सभेत राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण काका खाडे, भागवत तावरे, ज्येष्ठ नेते मोईन मास्टर साहेब, संपादक शेख मुजीब शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल भैया गलधर, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष कमरुल इमान ,दिलीप अण्णा गोरे, बळीराम गवते,  फारूक पटेल, जावेद भैया कुरेशी, पांडुरंग आवारे, झुंजार धांडे, जानी मामू, नजर खान आदी मान्यवर उपस्थित होते
Back to top button