बीड

बीड शहराच्या मागासलेपणा व दुरावस्थेतील विकासासाठी नैतिक जबाबदारी समजून कर्तव्य बजावणार

बीड शहराच्या मागासलेपणा व दुरावस्थेतील विकासासाठी नैतिक जबाबदारी समजून कर्तव्य बजावणार
बीड :- (दि. २८)बीड शहरातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता यांसारख्या मुलभूत सुविधांसाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. प्रस्थापित धनदांडगे लोकप्रतिनिधी प्रत्येक निवडणुकीत जात–धर्माच्या नावाने मते मागत असताना, नोटांचा पाऊस पाडण्यापलीकडे दुसरे कोणतेही वास्तविक काम न करता खोटी आश्वासने देत जनतेला फसवत आल्याचा आरोप नागरिकांकडून सातत्याने होत आहे.
जाहिर सभांमध्ये विकासाची मोठी स्वप्ने दाखवणारे हेच नेते सत्ता असताना केलेल्या कामाविषयी नागरिकांनी प्रश्न विचारताच निरुत्तर होताना दिसतात. स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी पक्षबदल करणाऱ्या अशा लोकप्रतिनिधींविषयी जनतेच्या मनात तीव्र नाराजी आणि प्रचंड असंतोष आहे.
या पार्श्वभूमीवर समाजासाठी अहोरात्र काम करणाऱ्या विश्व महिला कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष किष्किंधा पांचाळ यांनी बीड नगरपरिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरून सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बुलंद केला आहे.
जनतेने सर्वसामान्य चळवळीतील माझ्या सारख्या कार्यकर्त्याला संधी द्यावी –
गेली ११ वर्षापासून महिला, बहुजन तसेच मायक्रो ओबीसी समाजातील उपेक्षित वर्गासाठी काम करत असून या चळवळीच्या माध्यमातून आज पर्यंत हजारो लोकांना न्याय मिळवून देण्यात मी यशस्वी झाले आहे या प्रवासात अनेक राजकीय,सामाजिक व विविध क्षेत्रातील व्यक्तींचे मला वेळोवेळी पाठबळ लाभले आहे सामाजिक चळवळींना व्यापक पाठबळ मिळून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवीण्यासाठी मी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले असून बीड नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमधे वार्ड क्रमांक १ मधून मी आम आदमी पक्षाकडून झाडू या  चिन्हावर निवडणूक लढवत आहे त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरील
प्रामाणिक चळवळी चालवणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्तीला नगर पालिकेत काम करण्यासाठी संधी द्यावी जेणेकरून गेली पन्नास वर्षापासून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची व शहरातील जनतेची सेवा करून बदल घडावा एवढीच माझी अपेक्षा असून जनतेने मला आशीर्वाद द्यावेत मला नगरसेवक पदावर संधी द्यावी शहराच्या सार्वजनिक प्रगतीमधे खारीचा वाटा उचलण्याचे कार्य माझ्या हातून निश्चितपणे घडेल अशी मी हमी देते.
आम आदमी पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मधून “झाडू” चिन्हावर निवडणूक लढवत असून, बीड शहरातील मागासलेपणा, गैरव्यवस्था आणि विलंबित विकासाच्या प्रश्नांची जबाबदारी स्वतःची नैतिक कर्तव्य म्हणून स्वीकारून काम करणार असल्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
किष्किंधा पांचाळ यांनी स्पष्ट केले की,
“बीड शहर बदलले पाहिजे, यासाठी जनतेने आता भीती, लोभ आणि जात-धर्माच्या राजकारणातून मुक्त होऊन खऱ्या विकासाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे.”
बीडच्या नागरिकांसाठी पारदर्शक, उत्तरदायी आणि विकासाभिमुख नगरपरिषद उभी करण्याचा निर्धार त्यांच्या प्रचारातून स्पष्टपणे दिसत आहे.
Back to top button