बीड

जनावरांना क्रूर वागणूक व अवैध वाहतुकीवर पोलिसांची कारवाई;  २३,८०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त

जनावरांना क्रूर वागणूक व अवैध वाहतुकीवर पोलिसांची कारवाई;  २३,८०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त
दै सूर्योदय:- जवाहरनगर:- जवाहरनगर पोलिसांनी दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४.०० वाजता मौजा कोंढी गावाजवळ अवैध जनावर वाहतुकीवर कारवाई केली. पोलिसांनी आरोपी आसिक मनहरण जोशी (वय २४, रा. भिलाई, ता. धमदा, जि. दुर्ग, छत्तीसगढ) आणि रोशनलाल रामस्वरुप डहेरिया (वय ३३, रा. पथारा, ता. धमदा, जि. दुर्ग, छत्तीसगढ) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्या तपकिरी रंगाच्या आयसर कंपनीच्या वाहन (क्र.  सीजी०७ सीएक्स ३८३३, किंमत  २०,००,०००/- रु.) मध्ये एकूण 38 गोवंश जातीचे जनावरे वाहतूक केली जात होती, ज्यांची किंमत अंदाजे  ३,८०,०००/- रु. होती. वाहतुकीदरम्यान जनावरांसाठी आवश्यक असलेली २x२ मीटर जागा उपलब्ध न करता, ते दाटीवाटीने, अन्न-पाणी व निवाऱ्याशिवाय, क्रूरतेने वाहतूक केली जात होती. या कारवाईत ४ जनावरे मृत असल्याचे समोर आले.
सदर प्रकरणी फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध ३१४/२०२५ नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा (कलम ५, ५(अ), ५(ब), ९) आणि प्राणी क्रूरतेवर प्रतिबंधक अधिनियम (कलम ११(१) (घ),(च),(ड),(ज),(झ)) तसेच भारतीय दंड संहिता कलम ३२५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक  नूरुल हसन,  अपर पोलीस अधीक्षक  निलेश मोरे, पोनि. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनि. चुटे, स. फौ. गोंडाने, पोहवा. सपाटे, पोशि. नारनवरे, पो.स्टे. जवाहरनगर यांनी केली. पुढील तपास पो. उपनि. दुधकावरा, पोलीस स्टेशन जवाहरनगर करीत आहेत.
Back to top button