मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पक्षात रमेश मोरे यांची एन्ट्री; जिल्हा परिषद साठी उमेदवारी अर्ज दाखल.

मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पक्षात रमेश मोरे यांची एन्ट्री; जिल्हा परिषद साठी उमेदवारी अर्ज दाखल.
विशेष प्रतिनिधी : नंदकुमार चांदोरकर
मोर्बा मांजरोने गणातून रमेश पांडुरंग मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राज्याचे मंत्री तथा शिवसेना नेते मा. नामदार भरतशेठ गोगावले यांच्या पक्षातून त्यांनी सोमवार दि. १९ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद साठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला.
मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली रमेश मोरे यांनी शिवसेनेची विचारधारा स्वीकारत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
रमेश मोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मोर्बा, मांजरोने, गणात शिवसेनेची ताकद अधिक बळकट होणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाल्याची चर्चा आहे.
शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार रमेश मोरे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा धडाका सुरू राहील, असा विश्वास उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला.



